उल्हासनगर स्थानक रस्ता रुंद होणार 

उल्हासनगर स्थानक रस्ता रुंद होणार 

उल्हासनगर : उल्हासनगर रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील अरुंद रस्ता 40 फुटांचा होणार आहे. अरुंद रस्त्यामुळे या भागात वाहनांची मोठ्या प्रमाणात कोंडी होत होती. त्यामुळे स्थानकात जाणाऱ्या प्रवाशांना मोठी कसरत करावी लागत होती. याबाबत शिवसेना नगरसेवक सुनील सुर्वे यांनी पालिकेकडे पाठपुरावा करत रस्ता रुंद करण्याची मागणी केली होती. त्यानुसार या रस्त्यांची रुंदीकरण करण्यात येणार असून, आज दुपारी पालिका अधिकाऱ्यांनी 182 दुकानांवर "मार्किंग' केली आहे. या रस्त्यावरील दुकाने 1 ते 7 फुटाने तुटणार आहेत. 

रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला एखादा एखादा ट्रक, अवजड वाहन आले की पूर्णताः वाहतूक कोंडी होत होती. त्यामुळे जीजामाता चौक ते उल्हासनगर रेल्वे स्थानक या तोकड्या रस्त्याचे रुंदीकरण करण्याची मागणी नगरसेवक सुर्वे यांनी केली होती. आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या निर्देशानुसार सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी, अजित गोवारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता तरुण सेवकानी, विनोद खामितकर यांनी या रस्त्याच्या रुंदीकरणात अडथळा ठरणाऱ्या 182 दुकानांवर कटिंगची मार्किंग दिली आहे. यात सर्वाधिक नुकसान स्थानकाच्या समोरील शनिमंदिर रस्त्यावरील दुकानांचे होणार आहे. 

दुकानदार न्यायालयात 
रस्ता रुंदीकरणाविरोधात शनिमंदिर रस्त्यावरील 6 दुकानदारांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने या कारवाईला 27 जानेवारीपर्यंत स्थगिती आदेश दिला असल्याची माहिती व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष तसेच कॉंग्रेस उपाध्यक्ष शंकर आहूजा यांनी दिली. आज कॉंग्रेस शहराध्यक्ष राधाचरण, सरचिटणीस रोहित साळवे, कुलदीपसिंह मथारू, किशोर धडके आदींनी आयुक्त सुधाकर देशमुख यांची भेट घेऊन 40 फुटांचा रस्ता 30 फूट करण्याची मागणी केली आहे.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com