उल्हासनगरचे नवे एसीपी मारुती जगताप यांनी स्विकारला पदभार

दिनेश गोगी
मंगळवार, 26 जून 2018

उल्हासनगर : गेल्या अनेक महिन्यापासून रिक्त असलेल्या उल्हासनगर सहाय्यक पोलीस आयुक्त अर्थात एसीपी पदी एमपीएससीचे अधिकारी मारुती जगताप यांनी आज पदभार स्विकारला आहे.

मारुती जगताप यांनी 2010 मध्ये एमपीएससी परिक्षा उत्तीर्ण केल्यावर त्यांची थेट सहाय्यक पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. दोन वर्ष ट्रेनिंग पूर्ण केल्यावर जगताप यांच्याकडे 2012 मध्ये नक्षलवादी गडचिरोलीचा पदभार सोपवण्यात आला. याठिकाणी तीन वर्ष कामाचा ठसा उमटवल्यावर जगताप यांची रत्नागिरी येथे बदली झाली. रत्नागिरी मध्ये तीन वर्षे पूर्ण झाल्यावर मारुती जगताप यांची उल्हासनगरच्या एसीपी पदी नियुक्ती झाली आहे.

या शहराचा प्रथम संपूर्ण राजकीय गुन्हेगारी असा अभ्यास केला जाणार आहे. असामाजीकत्त्व, अशांतता पसरवण्यात पुढाकार घेणारे, रेकोर्ड वरील प्रमुख गुन्हेगार, व्यापारी, नागरिकांना नाहक त्रास देणारे बोगस तक्रारधारक यांची माहिती घेण्यात येत आहे. एसीपी हे एक जबाबदार पोस्ट असून गडचिरोली, रत्नागिरी प्रमाणे उल्हासनगरकर आठवणीत ठेवतील असा कामाचा ठसा उमटवणार अशी प्रतिक्रिया मारुती जगताप यांनी व्यक्त केली.

Web Title: Ulhasnagar's new ACP Maruti Jagtap took over the charge