उल्हासनगरातील पोटनिवडणूकित 4 उमेदवार रिंगणात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 मार्च 2018

उल्हासनगर -  पुजाकौर लभाना यांचे बनावट जात प्रमाणपत्र रद्द झाल्याने प्रभाग 17 मध्ये (ओबीसी महिला राखीव) पोटनिवडणूक लागली आहे. 6 एप्रिल रोजी होणाऱ्या या निवडणुकीत 4 उमेदवार रिंगणात आहेत. हे रणकंदन जिंकण्यासाठी ओमी कालानी-भाजपा-साईपक्ष एकवटले असून, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते ओमी कालानी यांच्या कोटयातील उमेदवार प्राध्यापिका साक्षी पमनानी यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले आहे.

यावेळी ओमी कालानी, महापौर मिना आयलानी, उपमहापौर जीवन इदनानी, भाजपाचे जिल्हाध्यक्ष कुमार आयलानी, नगरसेवक राजेश वधारिया, राजा गेमनानी, हरेश कृष्णाणी, रोशन वलेचा, अजित माखिजानी, पितू राजवानी, विक्रम छाबरा, कमलेश निकम, संतोष पांडे, नारायण पंजाबी, राजेश टेकचंदानी आदी उपस्थित होते.

भाजपाच्या शकुंतला जग्यासी यांनी माघार घेतल्याने काँग्रेसच्या जया साधवानी, राष्ट्रवादीच्या सुमन सचदेव, टीम ओमी कालानी यांच्या कोटयातील भाजपाच्या साक्षी पमनानी, अपक्ष सुरेखा सोनवणे हे चार उमेदवार रिंगणात आहेत. जया साधवानी यांनी केलेल्या तक्रारी वरून पुजाकौर यांचे नगरसेवक पद रद्द झाले. 

या निवडणुकीच्या निवडणूक निर्णय अधिकारी दीप्ती सुर्यवंशी असून, प्रभाग समिती 4 चे सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी हे आचारसंहिता प्रमुख आहेत.

Web Title: ullhasnagar elections 4 candidate