मराठी फलकांसाठी आंदोलन करणाऱ्या शिवसैनिकांची अखेर निर्दोष मुक्तता 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 एप्रिल 2018

डोंबिवली - मराठी भाषेच्या आग्रहाखातर आंदोलन करणाऱ्या शिवसैनिकांची तब्बल दहा वर्षानंतर निर्दोष मुक्तता. 

डोंबिवली - मराठी भाषेच्या आग्रहाखातर आंदोलन करणाऱ्या शिवसैनिकांची तब्बल दहा वर्षानंतर निर्दोष मुक्तता. 

दुकाने व आस्थापनांच्या पाट्या /फलक हे मराठी भाषेत पाहिजेत असा कायदा आहे. डोंबिवलीतील दुकाने निरिक्षक या अधिकाऱ्यांने याची अंमलबजावणी करायला हवी परंतु, असे होत नाही. बहुतांश फलक इंग्रजीतच होते. यावर कारवाईची वारंवार मागणी करत 2006मध्ये शिवसेनेतर्फे होत होती. सर्वप्रथम याबाबत आवाज उठवून वारंवार निवेदने देऊन फरक पडत नसल्याने तीव्र आंदोलन करण्यात आले होते. याप्रकरणी पोलीसांनी स्थानिक शिवसेना पदाधिकारी, महिला आघाडी पदाधिकारी व शिवसैनिक अशा एकूण अकरा जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. तब्बल बारावर्षांनंतर या गुन्ह्याचा न्याय निवाडा होऊन सध्याचे उपजिल्हाप्रमुख व दक्षिण रायगड संपर्क प्रमुख सदानंद थरवळ, माजी नगरसेवक शरद गंभीरराव,प्रभाकर चौधरी, श्रीराम मिराशी, चंद्रशेखर कुलकर्णी, अभिषेक थरवळ, अविनाश पांचाळ, स्मीता बाबर, रेखा चौधरी, विनिता बने व भावना चव्हाण अशा अकरा जणांची बुधवारी कल्याण न्यायालयात निर्दोष मुक्तता करण्यात आली.

Web Title: Ultimate acquittal of Shiv Sena activists for campaigning for Marathi boards