नवी मुंबई महापालिका क्षेत्रात अनधिकृत बांधकामे

नवी मुंबई महापालिका क्षेत्रात अनधिकृत बांधकामे
नवी मुंबई महापालिका क्षेत्रात अनधिकृत बांधकामे

नवी मुंबई : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाल्यापासून शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू होती. आता आचारसंहिता संपल्यानंतरही ही बांधकामे जोमाने सुरू आहेत. यात नवी मुंबईबाहेरील बिल्डर लॉबीने शहरात शिरकाव केल्याने सध्या तीन ते चार महिन्यांतच या ठिकाणी मोठमोठे इमले उभे राहत आहेत. काही ठिकाणी अर्धवट अवस्थेतील बांधकामे वेगाने सुरू करण्यात आल्याने ती पूर्णत्वासही गेली आहेत. 

सिडकोने अनधिकृत बांधकामांवर अकुंश ठेवण्यासाठी कठोर उपायोजना केल्या आहेत. त्याचबरोबर महापालिकेने देखील भूमाफियांच्या विरोधात कंबर कसली आहे. त्यामुळे बेकायदा बांधकामांना काही प्रमाणात आळा बसला होता. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीचा फायदा घेत बिल्डर माफियांनी पुन्हा डोके काढले. पालिकेच्या हद्दीतील जुहूगाव, घणसोली, नेरूळ, वाशी गाव, कोपरखैरणे, ऐरोली, दिघा गावठाण परिसरात, सिडको तसेच औद्योगिक विभागाच्या जागेवर बिनधास्तपणे अनधिकृत इमारतींची बांधकामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. अतिक्रमण विभाग या बांघकामांवर कारवाई न करता सर्वसामान्य नागरिकांच्या भाजी मार्केट तसेच इतर व्यवसायांवर कारवाई करत आहे. यामुळे सामान्य नागरिकांच्या मनात या भेदभावाबाबत चांगलाच रोष निर्माण झाला असून, अतिक्रमण विभागाच्या कारवाईवर संशय व्यक्त केला जात आहे. नवी मुंबईमध्ये विनापरवाना अनधिकृत इमारती उभारणारे गोवंडी, भिवंडी, काळबादेवी, मुंब्रा या ठिकाणची बांधकाम व्यावसायिक आहेत. या बांधकामांना काही गावातील लोकांचा विरोध आहे. 

याबाबत पालिकेकडून सातत्याने कारवाई सुरू असते. तसेच पुन्हा अशी बांधकामे सुरू असतील तर संबंधित विभागाला सूचना देऊन कारवाईचे आदेश देण्यात येतील.
-अण्णासाहेब मिसाळ, आयुक्त, नवी मुंबई महापालिका.

स्थानिकांनी हे बांधकाम देताना बांधकामाचा दर्जा तपासावा. त्यानंतरच बांधकामे द्यावीत किंवा स्थानिक बांधकाम व्यावसायिक बघून बांधकामे द्यावीत.
-मेघनाथ भगत, स्थानिक रहिवासी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com