जव्हारच्या धरण परिसरात अनधिकृत बांधकामे 

भगवान खैरनार
शुक्रवार, 22 जून 2018

सांडपाणी आणि वाढत्या रहदारीमुळे, जयसागर धरणाचे पाणी दुषित होण्याची भीती निर्माण झाली आहे. परिणामी जव्हार करांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. 

मोखाडा - जव्हार शहराची तसेच परिसराची तहान भागविणाऱ्या एकमेव जयसागर धरणाच्या कॅचमेट परिसरात अनधिकृत बांधकामांनी धुडगूस घातला आहे. कोणतीही परवानगी न घेता होत असलेल्या या बांधकामांमुळे, तसेच सांडपाणी आणि वाढत्या रहदारीमुळे, जयसागर धरणाचे पाणी दुषित होण्याची भीती निर्माण झाली आहे. परिणामी जव्हार करांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. 
                   
जव्हार करांना पिण्याच्या पाण्याची, व्यवस्था जव्हार संस्थानचे राजे यशवंतराव मुकणे यांनी सन 1958 मध्ये जयसागर धरण बांधून केली आहे. या धरणातील पाण्याचा नळयोजनेद्वारे जव्हार करांना पाणी पुरवठा होत असला तरी, हे धरण कासटवाडी ग्रामपंचायत हद्दीत आहे. या धरणाच्या कॅचमेट परिसरात अनधिकृत बांधकामे केली जात असल्याचे प्रसिद्धी माध्यमांनी ही बाब उघडकीस आणली होती. त्यामुळे ग्रामपंचायतीने होणाऱ्या बांधकामाला नोटीसा बजावल्या होत्या. मागील वर्ष-दोन वर्षे अनधिकृत बांधकामे बंद झाली होती. दरम्यान, यापुर्वी धरण परिसराला लागुन मोठ्या संख्येने बांधकामे झाली आहेत.

मात्र, आता पुन्हा अनधिकृत बांधकामे जोरात सुरू झाली आहेत. त्याकडे कासटवाडी ग्रामपंचायत प्रशासनाने सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे. होणार्‍या अनधिकृत बांधकामांमुळे, येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढली आहे. त्यामुळे प्रदुषणाबरोबरच, येथील सांडपाणी धरणाच्या पाण्यात मिसळून पाणी दुषित होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे जव्हार वासीयांसह लगतच्या 25 नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. ही अनधिकृत बांधकामे वेळीच न थांबविल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा जव्हार सह परिसरातील नागरिकांनी दिला आहे. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Unauthorized constructions in Jawar dam area