कल्याण आरटीओ कार्यालय मार्फत बेकायदा रिक्षा जप्त

रविंद्र खरात 
बुधवार, 11 एप्रिल 2018

कल्याण - खासगी रिक्षा चालकांनी 31 मार्च पूर्वी आरटीओ कार्यालयमध्ये जाऊन परवान्यांवर नोंदणी करण्याची मुदत देण्यात आली होती. मात्र राज्यातील अनेक शहरातील रिक्षा चालकांनी नोंदणी न केल्याने अशा खासगी बेकायदा रिक्षा जप्त करण्याचे आदेश राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी सर्व आरटीओ कार्यालयांना दिले आहेत. त्या धर्तीवर कल्याण आरटीओ कार्यालय मार्फत कारवाई सुरू झाली असून 5 बेकायदा खासगी रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत. 

कल्याण आरटीओ अंतर्गत कल्याण, डोंबिवली, ठाकुर्ली, विठ्ठलवाडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा, मुरबाडचा समावेश होतो. राज्यात 17 जुलै 2017 रोजीच्या अधिसूचने द्वारे ऑटो रिक्षा टॅक्सी परवान्यावरील निंर्बंध उठविले आहेत. तसेच खासगी ऑटो रिक्षांना काही शुल्क आकारून परवान्यांवर नोंदणी करण्याची परवानगी देण्यात आली होती. या निर्णयामुळे राज्यातील अवैध खासगी ऑटो रिक्षाना परवाना घेऊन अधिकृत होण्याची संधी होती. त्यासाठी 31 मार्च 2018 पर्यंतचा कालावधी देण्यात आला होता. मात्र त्याला प्रतिसाद न मिळाल्याने राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सर्व आरटीओ कार्यालयाला या रिक्षावर कारवाई करत रिक्षा जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. 

या आदेशानुसार कल्याण आरटीओ उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे यांच्या पथकाने 500 हुन अधिक खासगी बेकायदा रिक्षा चालकांना नोटिसा बजावल्या. तसेच 5 रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत. यामुळे बेकायदा खासगी रिक्षा चालकांचे धाबे दणाणले आहे.

जून 2017च्या आकडेवारी नुसार
कल्याण आरटीओ कार्यालय अंतर्गत येणाऱ्या शहरात कल्याणमध्ये 7 हजार 741, डोंबिवलीमध्ये 6 हजार 902, उल्हासनगर 5 हजार 413, अंबरनाथ 2 हजार 637, बदलापुर 2 हजार 104, टिटवाला 502 मुरबाड ग्रामीण 340, असे एकुन परवाना धारक 25299 रिक्षाची संख्या असून यात पेट्रोल 3 हजार 50, सीएनजी 21 हजार 337 एल पी जी 912 रिक्षा धावतात, तर टैक्सी काळी पिवळी 340 धावतात. हा आकड़ा अधिकृत असला तरी यापेक्षा जास्त रिक्षा रस्त्यावर धावत असून, अंदाजे 200 ते 225 बेकायदा रिक्षा या परिसरात असाव्यात.

बेकायदा खासगी रिक्षाची शोध मोहीम सुरू केली असल्याची माहिती कल्याण आरटीओ उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे यांनी दिली .

Web Title: Unauthorized rickshaw seized by the Kalyan RTO office