अघोषित संपामुळे  महामंडळास जाग 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 जून 2018

मुंबई -एसटी कर्मचाऱ्यांनी समाजमाध्यमांतून आज मध्यरात्रीपासून अघोषित संपाची हाक दिली आहे. संपाची नोटीस देणे शक्‍य नसल्याने कामगार संघटनांनी गोपनीयरीत्या कर्मचाऱ्यांना सोशल मीडियावरून संपाचे आवाहन केले आहे. या पोस्टमुळे खडबडून जागे झालेल्या महामंडळाने संपाबाबत योग्य ती खबरदारी घेण्याचा आदेश संबंधितांना दिला आहे. एकीकडे कायदेशीर बंधनांमुळे नोटीस देणे शक्‍य नसल्याने संपाबाबत एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी तोंडावर बोट ठेवले आहे. तर, हा संप होणार, हे गृहीत धरून सोलापूरच्या एसटी विभाग नियंत्रकांनी आगारप्रमुखांना घ्यावयाच्या काळजीवजा सूचनांचे पत्र पाठवले आहे. हे पत्र दै. "सकाळ'कडे आहे. 

परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी वर्धापन दिनाचा मुहूर्त साधत एसटी कर्मचाऱ्यांसाठी वेतनवाढ घोषित केली होती. ज्या कर्मचाऱ्यांना ही वेतनवाढ मान्य नसेल त्यांनी महामंडळाकडे 9 जून 2018 पर्यंत लेखी स्वरूपात अर्ज भरावा व असा अर्ज स्वीकारताना चित्रीकरण होणार असल्याने एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांमध्ये खदखद आहे. परिणामी, कर्मचाऱ्यांच्या वतीने सोशल मीडियात संपाची हाक देत महामंडळाच्या विरोधात एल्गार पुकारण्यात आला आहे. 

Web Title: undeclared strike st employee