उड्डाणपुलांखाली बहरणार उद्याने

उड्डाणपुलांखाली बहरणार उद्याने

मुंबई - शहरातील सहा उड्डाणपुलांखाली उद्याने बहरणार आहेत. त्यासाठी महापालिका सुमारे पाच कोटी रुपये खर्च करणार आहे. तीन पुलांखाली उद्यान तयार होणार आहे. तीन पुलांच्या खांबांवर व्हर्टिकल गार्डन करण्यात येणार आहे.

पालिकेने उड्डाणपुलांखालील उद्यानांसाठी निविदा प्रक्रिया सुरू केली असल्याचे उद्यान विभागाचे प्रमुख जितेंद्र परदेशी यांनी सांगितले. उद्यानात फक्त रोप लावण्यात येणार नसून पहिल्यांदाच स्केटिंग रिंग तयार करण्यात येणार आहे, असेही परदेशी यांनी सांगितले. कार्यादेश देण्यात आल्यानंतर तीन ते चार महिन्यांत कामे पूर्ण करण्याचा पालिकेचा विचार आहे. याआधी महापालिकेने काही उड्डाणपुलांखाली असे उद्यान तयार केले आहे.

  हिंदमाता उड्डाणपुलाच्या सुमारे १२ हजार चौरस फुटांहून अधिक जागेत उद्यान तयार करण्यात येणार आहे. तिथे स्केटिंग रिंगही तयार करण्यात येईल.
  परळ सेनापती बापट मार्गावरील उड्डाणपुलाखालील १० हजार चौरस फुटांहून अधिक जागेत उद्यान असेल. 
  वरळीतील ॲनी बेझंट मार्गावरील उड्डाणपुलाखाली सात हजार चौरस फुटाहून अधिक क्षेत्रफळाचे उद्यान असेल. रोषणाईही करण्यात येईल.
  भायखळा वाय पुलाखाली व्हर्टिकल गार्डन तयार करण्यात येईल. चार खांबांवर असे उद्यान असेल.
  महम्मद अली मार्ग उड्डाणपुलाच्या तीन पुलांवर उद्यान असेल. आकर्षक रोषणाईही असेल.
  दादर पूर्वेकडील कवी केशवसुत पुलाखालील १२ खांबांवर व्हर्टिकल गार्डन तयार करण्यात येणार आहे. आकर्षक रोषणाईही असेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com