दीड टनाच्या अत्याधुनिक कचराकुंड्या... लवकरच तुमच्या शहरात!

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 23 January 2020

नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाकडून प्रायोगिक तत्त्वावर भूमिगत कचराकुंड्या बसविण्यात येणार आहेत. सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर तीन ठिकाणी या कचराकुंड्या बसविण्यात येणार आहेत. 

नवी मुंबई : पालिका क्षेत्रातील प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाकडून प्रायोगिक तत्त्वावर भूमिगत कचराकुंड्या बसविण्यात येणार आहेत. सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर तीन ठिकाणी या कचराकुंड्या बसविण्यात येणार आहेत. 

ही बातमी वाचली का? 'या' जिल्ह्यातील शेतकऱ्यांची फरपट..

उघड्यावरील सार्वजनिक कचराकुंड्यांमुळे प्रदूषणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. याचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या कुंड्या हटवून भूमिगत कचराकुंड्यांचा प्रयोग पालिकेच्या वतीने राबविण्यात येणार आहे. शहरात सुरुवातीला घंटागाडीद्वारे कचऱ्याचे संकलन केले जात होते. त्यानंतर मोठ्या वाहनांद्वारे शहरातील कचरा उचलला जात होता. तत्कालीन आयुक्त आबासाहेब जजहाड यांनी स्थानिक ठेकेदारांकडून उघड्या वाहनातून कचरा गोळा करण्याचा प्रकार बंद केला. त्यानंतर तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी तर "माझा कचरा माझी जबाबदारी' या उद्देशाने कचरा वर्गीकरणाची सक्ती केली. आता नवी मुंबई शहरात विविध आकाराच्या कचराकुंड्यांमध्ये सार्वजनिक कचरा संकलन केले जाते; तर ओल्या आणि सुक्‍या कचऱ्याची वाहतूक वेगवेगळ्या वाहनांद्वारे केली जाते. त्यातच उघड्या कचराकुंड्यांभोवती दुर्गंधीचे साम्राज्य पसरलेले दिसते. 

ही बातमी वाचली का? मुंबापुरीची गगनचुंबी वाटचाल!

दीड टन क्षमता 
भूमिगत कचराकुंड्या बसवल्याने सार्वजनिक ठिकाणचा कचरा जमा करता येणार आहे. एका भूमिगत कचराकुंडीत 1.5 टन कचरा साठवता येणार आहे. या कचरापेट्यांना सेन्सर लावण्यात येणार आहे. गृहसंस्थांमधील कचरा या भूमिगत कचराकुंड्यांमध्ये टाकता येणार नाही. या कचराकुंड्यांचा आकार 16 बाय 30 ते 16 बाय 32 असा आहे. अशा पद्धतीच्या कचराकुंड्या सध्या बंगळूरुमध्ये वापरल्या जात आहेत. एका कचराकुंडीत मोठ्या प्रमाणात कचरा साठवला जाणार असून, यात सोसायट्यांमधून जमा केलेला कचरा टाकता येणार नाही. या कुंड्या भरल्यानंतर याची तंत्रज्ञानाद्वारे माहिती मिळेल व कचरा तातडीने उचलला जाईल. 

ही बातमी वाचली का? तो तिला गोड बोलून घरी घेऊन जायचा आणि...

दुर्गंधी आणि प्रदूषणाला आळा घालण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने भूमिगत सार्वजनिक कचराकुंड्या उभारण्याचे प्रशासनाच्या विचाराधीन आहे. या भूमिगत कचराकुंड्या सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर तीन सार्वजनिक ठिकाणी बसविण्यात येणार आहेत. भूमिगत कचराकुंड्यांमध्ये पावसाळ्यात पाणी साचणार नाही. 
- तुषार पवार, उपायुक्त, महापालिका. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: underground garbage system dustbins navi mumbai soon.