आयआरबीकडून अनधिकृत लेन कटिंग बंद करण्याचे काम हाती 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 एप्रिल 2018

कळमकर-खालापूर  - मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर डांबरीकरण, साइडपट्टी भराव व अनधिकृत लेन कटिंग बंद करण्याचे काम पूर्ण होत आले असून, आयआरबीकडून काही ठिकाणी झुकते माप देण्यात आल्यामुळे अपघाताची शक्‍यता वाढली आहे. मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर अनधिकृत लेन कटिंग अपघाताला कारणीभूत ठरत आहेत. अशा लेन कटिंगवर आयआरबीकडून उपाययोजना करण्यास होत असलेली दिरंगाईची बातमी "सकाळ'मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर त्याची दखल घेत अनधिकृत लेन कटिंग बंद करण्याचे आणि पावसाळ्यापूर्वी महामार्गाच्या डागडुजीचे काम आयआरबीकडून हाती घेण्यात आले आहे. 

सध्या खालापूर हद्दीत राष्ट्रीय महामार्गावर डांबरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. साइडपट्टीवर मातीचा भराव आणि कॉंक्रीटचा एक फुटाचा कट्टा बांधकाम करून अनधिकृत लेन कटिंग बंद करण्याचे कामही जवळपास पूर्ण झाले आहे; परंतु खालापूर हद्दीत रिंकी हॉटेल व पेट्रोल पंपाजवळ अनधिकृत लेन कटिंग बंद करण्याचे आयआरबीकडून मुद्दाम टाळण्यात आले आहे. या ठिकाणी खोपोलीकडे जाताना उतार असून अपघाताच्या अनेक घटना घडल्या आहेत. गाव, वाडीवस्ती अशा ठिकाणी केवळ लेन कटिंग असावी, असा नियम असताना आयआरबीकडून नियमांचे उल्लंघन होत असेल, तर दाद कोणाकडे मागावी, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

"माधवबाग'ला झुकते माप का? 
आयआरबीचे अभियंता अभय पावसकर यांना रिंकी हॉटेलजवळील अनधिकृत लेन कटिंगबाबत विचारणा केल्यानंतर त्यांनी ही लेन कटिंग माधवबाग रुग्णालयाकरिता विनंतीवरून देण्यात आल्याचे सांगितले; परंतु या ठिकाणी अपघाताची संख्या पाहता, लेन कटिंग अयोग्य असून माधवबागला झुकते माप का, असा प्रश्न इतर व्यावसायिकांना पडला आहे. 

Web Title: Undertaking closure of unauthorized lane cutting by IRB