अंडरवर्ल्ड डॉन सुरेश पुजारीचा एसएमएस द्वारे खंडणीचा नवा फंडा

दिनेश गोगी
शनिवार, 5 मे 2018

उल्हासनगर - नेत्यांनी, उद्योगपतींनी शिव्यांची लाखोली वाहिल्याने आणि व्यापारी देखील बाहेर देशातील अननोन नंबरचे फोन उचलत नसल्याने अंडरवर्ल्ड डॉन सुरेश पुजारी याने एसएमएस द्वारे खंडणी मागण्याचा नवा फंडा सुरू केला आहे.

उल्हासनगर - नेत्यांनी, उद्योगपतींनी शिव्यांची लाखोली वाहिल्याने आणि व्यापारी देखील बाहेर देशातील अननोन नंबरचे फोन उचलत नसल्याने अंडरवर्ल्ड डॉन सुरेश पुजारी याने एसएमएस द्वारे खंडणी मागण्याचा नवा फंडा सुरू केला आहे.

कालरात्री उल्हासनगरातील व्यापारी मनीष बठीजा या 30 वर्षीय व्यापाऱ्याला सुरेश पुजारी याने फोन केला. परंतु, बठीजा यांनी फोनला प्रतिसाद दिला नसल्याने पुजारी याने एसएमएस करून बठीजा यांच्याकडे 10 लाख रुपयांची खंडणी मागितली. खंडणीची रकम न दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी देखील दिली. याप्रकरणी बठीजा यांनी दिलेल्या तक्रारीवरून पुजारी याच्यावर  उल्हासनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन तीन वर्षांपूर्वी सच्चानंद या केबल व्यावसायिकाची खंडणीसाठी हत्या केल्यावर गँगस्टर पुजारी याने डोके वर काढले होते. अनेक व्यापाऱ्यांना त्याने खंडण्या मागितल्यावर या व्यापाऱ्यांनी पोलिस ठाण्यात तक्रारी केल्या. मात्र उद्योगपती सुमित चक्रवर्ती, आकाश चक्रवर्ती यांना पुजारीने खंडणीचा फोन केल्यावर चक्रवर्ती यांनी पुजारीला प्रत्युत्तर म्हणून शिव्यांची लाखोली वाहिली होती. याशिवाय आमदार गणपत गायकवाड, जितेंद्र आव्हाड यांनी देखील पुजारीचा फोन वर समाचार घेतला होता.

मात्र आता फोन केले तर कुणी उचलत नाही आणि उचलला तर शिव्या मिळण्याची शक्यता असल्याने पुजारीने एसएमएस द्वारे खंडणी मागण्याचा नवा फंडा अवलंबला आहे.

Web Title: Underworld Don Suresh Pujari's ransom through SMS