गणेशोत्सवात म्हणून काेकणातील वीज पुरवठा खंडीत हाेणार नाही

वीज पुरवठा पुर्ववत करताना कर्मचारी.
वीज पुरवठा पुर्ववत करताना कर्मचारी.

मुंबई  : गणेशोत्सव काळात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह कोकण भागात 24 तास वीजपुरवठा करण्यात यावा, असे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी मंगळवारी (ता.11) महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले. 

महावितरण कार्यालयात डॉ. राऊत आणि खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. या वेळी राऊत यांनी हे आदेश दिले. रोहा येथे 22 केव्ही स्वीचिंग सबस्टेशन उभारण्यासाठी 2800 चौरस मीटरची जागा उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच श्रीवर्धन तालुक्‍यात अतिउच्चदाब (ईएचव्ही) उपकेंद्र उभारल्यास दिघी बंदरासाठी ते फायदेशीर ठरू शकेल. रोहा तालुक्‍यामध्ये आरएसजे खांबांची आवश्‍यकता आहे. तळा तालुक्‍याची भौगोलिक परिस्थिती पाहता सुरळीत वीज पुरवठ्यासाठी विद्युतपुरवठा यंत्रणेची विभागणी करण्यासंदर्भातही कारवाई करण्यात यावी, असेही निर्देश राऊत यांनी यावेळी दिले. 

खूशखबर : मुंबईत रुग्णवाढीची गती मंदावली

दीड महिन्यापुर्वी आलेल्या निसर्ग वादळात कोकणातील वीज पुरवठा विस्कळीत झाला होता. तो अत्यंत सावकाशपणे पुर्ववत झाला. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप आहे. या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाच्या काळात वीज पुरवठा खंडीत झाल्यास महावितरणला नागरिकांच्या तीव्र संतापाला सामोरे जावे लागेल. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com