Union Budget 2021 : येणाऱ्या अर्थसंकल्पातून मुंबईकरांना लाईफलाईन लोकलसाठी काय हवंय?

Union Budget 2021 : येणाऱ्या अर्थसंकल्पातून मुंबईकरांना लाईफलाईन लोकलसाठी काय हवंय?

मुंबई : अर्थसंकल्प, सर्वसामान्य नागराज अर्थसंकल्पाला बजेट या नावानेच ओळखतात. तुमच्या आमच्या सर्वांच्या आयुष्यावर दूरगामी परिणाम करणारी दरवर्षीची महत्त्वाची घटना म्हणजे देशाचं बजेट. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशाची अर्थव्यवस्था आजही उण्या आकडेवारीत पाहायला मिळतेय. एकीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत हा नारा दिलाय. तर दुरीकडे जगभरातील इतर देशांचा चीनवरील कमी झालेला विश्वास भारताच्या पथ्यावर पडून देशाची आर्थिक स्थिती सुधारू शकते, असे संकेत अर्थतज्ज्ञांकडून देण्यात येतायत. 

कोरोनाच्या पाश्वभूमीवर यंदाचा अर्थसंकल्प हा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. सर्वसामान्य नागरिकांना अर्थसंकल्पाकडून कायमच अपेक्षा असतात. १ एप्रिलपासून सुरु होणाऱ्या नव्या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प १ फेबुवारी २०२१ रोजी लोकसभेत मांडला जाईल. सामान्य मुंबईकरांच्या यंदाच्या अर्थसंकल्पाकडून काय अपेक्षा आहेत हे जाणून घेण्याचा आपण या लेखातून प्रयत्न करणार आहोत. 

मुंबईकरांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय म्हणजे मुंबईतील लोकल ट्रेन्स. प्रत्येक अर्थसंकल्पामधून मुंबईकरांना लोकल ट्रेनसाठी भक्कम तरतूद केली जावी असं कायम वाटतं. 

कर्जत आणि खोपोली गाड्यांची संख्या वाढावी

कोरोनाकाळामुळे मुंबईतील लोकल सेवा सर्वसामान्य नागरिकांसाठी अजूनही बंद ठेवण्यात आली आहे. मात्र येत्या काळात मुंबईची लोकल सर्वसामान्य नागरिकांसाठी खुली करण्यात येणार आहे. मुंबई शहर झपाट्याने वाढत असल्याने मुंबईतील गर्दी ही उपनगरांमध्ये स्थलांतरित होतेय. अशात कल्याण डोंबिवली, अंबरनाथ बदलापूर वांगणी यासारख्या ठिकाणांहून मुंबईत आणि मुंबईतून पुन्हा उपनगरांमध्ये जाणाऱ्या नागरिकांची संख्या वाढतेय.

कर्जत आणि खोपोली गाड्यांची संख्या वाढावी ही मागणी संग्राम शेलार यांनी केली आहे. बदलापूर अंबरनाथमध्ये गर्दी वाढतेय अशात वांगणी, नेरळ, शेलू या भागात नागरिकांची संख्या वाढतेय. सदर भागांमध्ये महाविद्यालये देखील झालेली असल्याने विद्यार्थी देखील मोठ्या प्रमाणात या  बाजूला लोकलने येत असतात. त्यामुळे कर्जत आणि खोपोलीदरम्यान गाडयांची संख्या वाढवली जावी अशी मागणी संग्राम यांनी  केली आहे.

कर्जत कल्याण ही शटल सेवा सुरु करावी

अधिकच्या गर्दीमुळे या भागातील जेष्ठ नागरिकांना सकाळच्या वेळी ट्रेनने प्रवास करता येत नाही. त्यामुळे कर्जत कल्याण ही शटल सेवा सुरु करावी. सोबतच कसारा कल्याण आणि कर्जत कल्याण हा तिसरा मार्ग होणार हे ममता बॅनर्जी रेल्वे मंत्री असल्यापासून बोललं जात आहे, तोही मार्ग लवकरात लवकर मार्गी लागावा अशीही मागणी संग्राम यांनी केली आहे .

पादचारी पुलांचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे

रेल्वे फेऱ्या वाढवण्याशिवाय अनेक रेल्वे स्थानांवर पादचारी पुलांची अवस्था वाईट आहे. वाईट अवस्थेतील पादचारी पुलांचे काम लवारात लवकर पूर्ण व्हावे अशी मागणी पल्लवी वाणी यांनी यांनी केली आहे.

रेल्वेतील सुरक्षेवर अधिकाधिक भर द्यावा

रेल्वेच्या सुरक्षेच्या दृतिकोनातून अनेक महिलांनी आपल्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. रेल्वेतील सुरक्षेवर अधिकाधिक भर देण्याची मागणी ठाण्यातील प्रेरणा सूर्यवंशी यांनी केलीये. नवीन ट्रेन्स आणण्यापेक्षा आहे त्या रेल्वेची सेवा अधिक चांगली करण्याची मागणी त्यांनी केली आहे. रेल्वे स्टेशनवर हवी तेवढी सेक्युरिटी नाही. नवी मुंबईतील रेल्वे स्टेशन्स हे मुंबईच्या तुलनेत सुरक्षित नाहीत. अनेक स्टेशनवरील CCTV  सुरु नाहीत अशीही खंत प्रेरणा यांनी व्यक्त केली. त्यामुळे रेल्वे सुरक्षेवर विशेष भर देण्याची गरज असल्याचं मुंबईकर महिलांनी सांगितलं. 

union budget 2021 expectation of mumbaikar for mumbai local trains

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com