
पश्चिम रेल्वेने महाराष्ट्रात वसई रोड येथे नवीन बाह्य टर्मिनसची योजना आखली आहे. वांद्रे टर्मिनस आणि मुंबई सेंट्रल टर्मिनसद्वारे हाताळल्या जाणाऱ्या बाहेरच्या गाड्यांचा भार कमी करण्यासाठी हे केले जात आहे. यासाठी वसई रेल्वे टर्मिनलची मागणी मान्य करण्यात आली आहे, ही घोषणा केंद्रीय रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांनी केली आहे. या घोषणेमुळे भाजप खासदार हेमंत सावरा यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. यांनी ही मागणी केली होती. त्यांची आता ही मागणी मान्य झाली आहे.