esakal | Unmasking Happiness | कोरोना काळात निराधारांचा ‘आधार’: रामदास शेवाळे
sakal

बोलून बातमी शोधा

Unmasking Happiness | कोरोना काळात निराधारांचा ‘आधार’: रामदास शेवाळे

कोरोनाने आलेल्या आर्थिक संकटाने कोट्यवधी लोक बेरोजगार झाले. अनेकांच्या घरात आर्थिक महामंदी आली. जे धडधाकट होते तेच मेटाकुटीला आले. अशा परिस्थितीत शारीरिकदृष्ट्या विकलांग आणि वैधव्य आलेल्या महिलांचा विचार न केलेलाच बरा

Unmasking Happiness | कोरोना काळात निराधारांचा ‘आधार’: रामदास शेवाळे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जगच बदलून गेले. अमेरिका, इंग्लंड, युरोप, इटलीसारखी प्रगत राष्ट्रे कोलमडून पडली. लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला; तर कोरोनाने आलेल्या आर्थिक संकटाने कोट्यवधी लोक बेरोजगार झाले. कोरोनाच्या तडाख्यातून भारतसुद्धा सुटला नाही. देशात विषाणूचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी टाळेबंदी करण्यात आली. यामुळे अनेकांच्या घरात आर्थिक महामंदी आली. जे धडधाकट होते तेच मेटाकुटीला आले. अशा परिस्थितीत शारीरिकदृष्ट्या विकलांग आणि वैधव्य आलेल्या महिलांचा विचार न केलेलाच बरा; मात्र कळंबोलीतील अशा निराधारांना शिवसेनेचे महानगरप्रमुख रामदास शेवाळे हे आधार बनले. त्यांच्या कामगिरीचा घेतलेला आढावा...

---------

राजाने मारले आणि निसर्गाने झोडपले, तर दाद कोणाकडे मागायची, अशी स्थिती कळंबोली वसाहतीमधील विकलांग आणि विधवा महिलांची झाली होती. त्यांच्यावर अगोदरच नियतीने घाला घातला होता आणि आता कोरोना विषाणूमुळे त्यांची नोकरी गेली किंवा ते करत असलेला छोटा व्यवसाय बंद झाला. त्यामुळे त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांवर उपासमारीची वेळ आली; मात्र या निराधारांना जीवनावश्‍यक वस्तू पुरवून त्यांना या जीवनसंघर्षात उभे राहण्याची ताकद शिवसेनेचे महानगरप्रमुख रामदास शेवाळे यांनी दिली. कळंबोलीतील निराधारांना रामदास शेवाळे प्रतिष्ठानच्या माध्यमातून तांदूळ, गव्हाचे पीठ, कांदे, बटाटे याशिवाय इतर जीवनावश्‍यक वस्तुवाटपाचा संकल्प करण्यात आला. आणि लागलीच संकल्पाची पूर्ततासुद्धा केली. शेवाळे यांनी सरासरी पंधरा ते वीस टन जीवनावश्‍यक वस्तू खरेदी केल्या. त्यांचे कीट बनवण्यात आले. विधवा आणि विकलांगांची माहिती संकलित करून एकही गरजू या मदतीपासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेत या जीवनावश्‍यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले. या जीवनावश्‍यक साहित्यासह सॅनिटाझर, मास्क यांचेदेखील वाटप करण्यात आले. जीवनावश्‍यक वस्तूंच्या खरेदीसाठी सुमारे अठरा ते वीस लाख रुपये खर्च करण्यात आले.

कामगारांसाठी पुढाकार  
कळंबोलीत आशिया खंडातील सर्वात मोठे स्टील मार्केट आहे. या ठिकाणी देशाच्या कानाकोपऱ्यातून लोखंड येते आणि जाते. मालाची लोडिंग अनलोडिंग येथे केली जाते. प्लेट, सळई त्याचबरोबर इतर प्रकारच्या लोखंडांचा व्यापार या मार्केटमध्ये होतो. या ठिकाणी मोठ्या संख्येने माथाडी कामगार काम करतात. त्यामध्ये परप्रांतीय मजुरांचा समावेश आहे. मार्च महिन्यापासून कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाऊन सुरू झाला. त्यामुळे कळंबोली स्टील मार्केट बंद होते. त्यामुळे येथील माथाडी कामगारांवर उपासमारीची वेळ आली. त्या वेळी शेवाळे यांनी पुढाकार घेत अटी आणि शर्तीच्या तत्त्वावर कळंबोली स्टील मार्केटमध्ये परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती. दरम्यान काही मजुरांना रामदास शेवाळे प्रतिष्ठानच्या माध्यमातून तांदूळ, गव्हाचे पीठ, बटाटे, कांदा त्याचबरोबर इतर जीवनाश्‍यक वस्तू देण्यात आल्या. रामदास शेवाळे प्रतिष्ठानचे सल्लागार ॲड. श्रीनिवास क्षीरसागर, राजू दाव, श्रीकांत फाळके यांच्यासह स्टील व्यापारी राजू भाई दवे, परवीन गोयल, मुकादम हणमंत पिसाळ, सुभाष ढवळे, बालाजी खोडेवाल यांनी मार्केटमध्ये जाऊन माथाडी कामगारांना खऱ्या अर्थाने मदतीचा हात दिला. दरम्यान शेवाळे यांच्या मागणीची दखल घेत मार्केटमध्ये काही अटी व नियम घालून काम करण्यास परवानगी देण्यात आली.

रेड झोनमध्ये मदतीचा हात
 कोरोनारुग्ण आढळल्यास संबंधित इमारती, सोसायट्यांना सील करण्यात येत असे. तो परिसर रेड झोन म्हणून घोषित करण्यात येत असे. तेथे रहिवाशांना बाहेर जाण्यास मनाई केली जात होती. त्याचबरोबर बाहेरील व्यक्तींना या ठिकाणी येण्यास मज्जाव करण्यात आला होता. त्यामुळे स्थानिक रहिवाशांना गैरसोयींना सामोरे जावे लागले. अशा सोसायट्यांमध्येसुद्धा रामदास शेवाळे यांनी जीवनावश्‍यक वस्तूंचे वाटप करून त्यांना काही प्रमाणात दिलासा दिला. त्याच काळात रमजानचा पवित्र महिना सुरू होता. गोरगरीब मुस्लिम बांधवांनासुद्धा अन्नधान्य देऊन परधर्म सहिष्णुता एकात्मतेचा संदेश शेवाळे यांनी आपल्या सामाजिक बांधिलकीतून दिला. कळंबोली येथील हनुमंत शिंदे यांची कन्या पूजा हिचा विवाह किशोर चोरत यांच्याशी निश्‍चित झाला होता; परंतु लॉकडाऊन असल्याने हा विवाह करण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या होत्या. रामदास शेवाळे यांनी या विवाहासाठी सुधागड हायस्कूलचा हॉल उपलब्ध करून दिला. १७ वऱ्हाडी मंडळींच्या उपस्थितीत स्वतः अंतरपाट धरून कळंबोलीमध्ये हा लग्नसोहळा पार पाडण्याचे काम त्यांच्या पुढाकाराने झाले. त्यामुळे लॉकडाऊनमध्येही नवदाम्पत्य सात फेरे घालून संसार थाटू शकले. तसेच रामदास शेवाळे यांनी आपला वाढदिवस साजरा न करता त्या दिवशीही गरजूंना अन्नदान व धान्यवाटप केले. त्याचप्रमाणे त्यांच्या वाढदिवसानिमित्त रामदास शिवप्रतिष्ठान कामोठा शाखेच्या वतीने अनेक सोसायट्यांमधून मास्क व सॅनिटायझरचे वाटप केले.

रुग्णांसाठी धाव
गरीब कोरोना रुग्णांना मोफत औषधोपचार व्हावेत, यासाठी प्रयत्नांची रामदास शेवाळे यांनी प्रयत्न केले. संबंधितांना वैद्यकीय उपचार देण्यासाठी पुढाकार घेतला. याशिवाय अनेकांना रुग्णालयात बेड उपलब्ध करून दिले. तसेच कित्येक गरीब गरजूंच्या बिलाची रक्कम त्यांनी स्वतःच्या खिशातून दिली. तसेच रुग्णांना आवश्‍यक असलेले औषध मिळवून दिले. सरकारी पातळीवरसुद्धा वेगवेगळ्या मुद्द्यांवर पत्रव्यवहार करून कोरोना रुग्णांना सुविधा मिळाव्यात, यासाठी काम केले. राज्य सरकारकडे या भागात वैद्यकीय सुविधा मिळाव्यात, या अनुषंगाने पाठपुरावा केला. महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या पॅनलवरील रुग्णालयात कोरोनारुग्णांना मोफत उपचार मिळावेत, याकरिता वरिष्ठ पातळीवर साकडे घातले. पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाविषाणूचे संक्रमण होऊ नये, या अनुषंगाने महापालिका प्रशासनाला वेळोवेळी सूचना करणारे पत्र त्यांनी दिले. त्याची काही प्रमाणात अंमलबजावणीसुद्धा करण्यात आली.

कोरोनावर मात, गरजूंना मदत
समाजसेवेचा वसा हाती घेतलेल्या रामदास शेवाळे यांनी कोरोनात गरिबांच्या मदतीत कुठलीही कसर ठेवली नाही. प्रत्येक कामात जातीने लक्ष घालून गरजूंना मदत मिळवून दिली. या काळात त्यांना कोरोनाने गाठले. त्यामुळे १४ दिवस सक्तीची विश्रांती घेणे त्यांना क्रमप्राप्त होते; मात्र ते क्वारंटाईन असले, तरी रामदास शेवाळे प्रतिष्ठानमार्फत गरजूंना मदत देणे सुरूच होते. रुग्णालयात ॲडमिट असतानाही त्यांनी अनेकांचे प्रश्न मार्गी लावले. धीरोदात्त असलेल्या रामदास शेवाळे यांनी कोरोनावर मात करत पुन्हा समाजसेवेला वाहून घेतले. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता निराधारांच्या मदतीला धावलेल्या
रामदास शेवाळे यांचे कार्य हे प्रत्येकाने सलाम करावे, असेच आहे.

------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Unmasking Happiness help to homeless during the Corona period by Ramdas Shewale navi mumbai marathi upadates 

loading image