Unmasking Happiness: पोस्ट कोविडमध्ये फिजिओथेरपी अतिमहत्त्वाची !

Unmasking Happiness: पोस्ट कोविडमध्ये फिजिओथेरपी अतिमहत्त्वाची !

मुंबई: श्वास घेण्यास त्रास होणे हे कोरोना संसर्गाच्या अनेक लक्षणांपैकी एक प्रमुख लक्षण मानले जाते. हे थेट फुफ्फुसांशी संबंधित आहे. कोरोना व्यतिरिक्त फुफ्फुसासंबंधित बरेच विकार आहेत सर्वात धोकादायक मानले जातात. ज्यात न्यूमोनिया,ऑक्सिजनचा प्रवाह कमी होतो. जेव्हा फुफ्फुस योग्यप्रकारे कार्य करत नाहीत किंवा त्यांच्याशी गंभीर आजाराचा संबंध असतो तेव्हा डॉक्टर्स काही थेरपींचा सल्ला देतात. ज्यातून प्रभावी फरक जाणवतो असे तज्ज्ञ डॉक्टर्स म्हणतात. याला वैद्यकीय भाषेत चेस्ट फिजिओथेरपी असे म्हणतात. त्यामुळे पोस्ट कोविड रुग्णांमध्ये फिजिओथेरेपी वाचून दुसरा पर्याय नाही, आणि दुर्देवाने त्याकडे लक्ष दिले जात नाही. अनेक काळ आयसीयू, स्टेरॉईड्स, सतत ऑक्सिजन दिल्या गेलेल्या रुग्णांची फुप्फुस व्यवस्थित होण्यास किमान 8 ते 12 आठवडे लागतात. त्यासाठी रोज किमान 45 मिनिटे श्वसनाचे व्यायाम करावे. जेणेकरुण फुप्फुसाचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल.

या सर्वामध्ये फिजिओथेरेपीस्ट ऑक्सिजनची पातळी आणि श्वास घेण्यात येणाऱ्या अडचणी समजून घेतल्या जातात. कोविड झालेल्या व्यक्तीची काळजी नंतरचे 40 दिवस ते 4 महिने घेणे आवश्यक आहे, असे आता केलेल्या अनेक निष्कर्षातून समोर आले आहे. त्यामुळे फिजिओथेरपिस्ट लोकांना डिस्चार्जनंतर देखील मदत करतात. मुंबईतील अनेक कोविड सेंटर्स आणि रुग्णालयात डॉक्टरांनी रुग्णाच्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढवण्यास आणि त्यांच्या हृदयाचे ठोके सातत्याने तपासले जातात.

या वेळेस दिली जाते फिजिओथेरपी

न्यूमोनिया ते गंभीर कोरोनासारख्या रूग्णांना चेस्ट फिजिओथेरपी दिली जाईल. श्वास घेण्यास त्रास होत असल्यास छातीच्या फिजिओथेरपीची शिफारस केली जाते. डिस्चार्ज द्यायच्या आधी मोफत माहिती दिली जाते. त्यांची योग्य पद्धतीने तपासण्या केल्या जातात. शिवाय, रुग्णाला किती व्यायामाची गरज आहे हे पाहिले जाते. होम क्वारंटाईनमध्ये राहणारी व्यक्ती स्वत: ची दैनंदिन कामे करु शकते का हे पाहिले जाते. दुसरे म्हणजे सहा मिनिटे वॉक, म्हणजे व्यक्ती कमीत कमी 100 मीटरपर्यंत चालली पाहिजे. त्यात त्यांची ऑक्सिजनची पातळी कमी होते ही पाहिले जाते. त्यानुसार, व्यायामाची किती गरज आहे हे ठरवले जाते. त्यानंतर, 30 सेंकदात 8 वेळा खूर्चीवर उठण्याबसण्याचा व्यायाम सांगितला जातो अशी माहिती केईएम रुग्णालयाच्या फिजिओथेरपी विभागाच्या सहयोगी प्राध्यापक मारिया जिंदानी यांनी दिली आहे.

फुप्फुसाच्या कार्यक्षमतेची क्षमता वाढवण्यासाठी फिजिओथेरपी खूप महत्त्वाची ठरते. स्नायू, श्वास, हृदय आणि फुप्फुस या सर्व अवयवांवर लक्ष ठेवले जाते. व्हॉट्सअॅप कॉल, व्हिडिओ कॉलवर घरी गेल्यानंतरही ऑक्सिजनची पातळी आणि व्यायाम सांगितला जातो. दर सोमवारी आणि गुरुवारी रुग्णालयात पोस्ट कोविड ओपीडी असते. रुग्णांना पूर्ण दिवसाचे वेळापत्रक तयार करुन दिले जाते. श्वासाच्या पद्धतींमध्ये बदल केला जातो. थेराबँड्स, इलास्टिक्स बँड्स वापरुन व्यायाम सांगितला जातो.
मारिया जिंदानी, सहयोगी प्राध्यापक, फिजिओथेरपी विभाग,केईएम रुग्णालय

किती रुग्णांना फिजिओथेरपीची गरज भासते?

आरोग्यासाठी कमीत कमी 10 मिनिटे चाललेच पाहिजे असं सांगत पोस्ट कोविड रुग्णांचा व्यायामाचा प्रकार हळूहळू वापरला जातो. स्नायूंची ताकद वाढवण्यासाठीही वेगळे व्यायाम प्रकार सांगितले. या सर्वात आहारात बदल करणे गरजेचे असते. एका मिनिटांत श्वास किती वेळ थांबून ठेऊ शकतो हा प्रकार त्यांच्या श्वासोच्छवासाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी मदत करतो. आठवड्यातून दोनदा असणाऱ्या पोस्ट कोविड ओपीडीत दिवसांला किमान 7 ते 8 नवे रुग्ण असतात. किंवा अनेकदा फॉलो अपचे ही रुग्ण असतात. असे आठवड्यात किमान 48 रुग्ण वेगवेगळ्या थेरेपीसाठी येतात.

पूर्ण निरीक्षणाखाली व्यायाम शिकवला जातो

फिजिओथेरपीसाठी पूर्ण निरीक्षण केले जाते. रुग्ण योग्य पद्धतीने व्यायाम प्रकार करतो कि नाही यावरह लक्ष दिले जाते. जर वारंवार थकवा जाणवत असेल तर त्याची कारणमिमांसा केली जाते. ज्यामुळे, त्यावर तोडगा काढणे सोपे जाईल असे ही डॉ. जिंदानी यांनी स्पष्ट केले आहे.

---------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Unmasking Happiness Physiotherapy vital in post covid will help improve breathing

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com