रायगड किल्ला आता अहोरात्र उजळणार; पुरातत्व विभागाने दाखवला हिरवा कंदील

raigad fort
raigad fortsakal media

महाड : हिंदवी स्वराज्याची राजधानी असणाऱ्या रायगडावर (Raigad Fort) अखंडित वीजपुरवठा (Unstoppable Electricity) होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. केंद्रीय पुरातत्त्व विभागाने यासाठी आवश्यक असणाऱ्या कामांसाठी हिरवा कंदील (Work permission) दाखवला आहे. त्यामुळे महावितरणने (MSEB) या ठिकाणी अत्यावश्यक असलेला अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी रायगडावर विविध कामे सुरू केली आहेत. गडावर चार ठिकाणी विद्युत रोहित्र (Generator) व वितरण पॅनल बसवण्याचे काम पूर्ण झाले आहे. यामुळे शिवप्रेमी नागरिक आनंद व्यक्त करत आहेत.

raigad fort
कर्नाटकातील परिस्थिती मुंबईत; मुस्लिम महिलेला लोकलमध्ये बसण्यास नकार

किल्ल्याच्या जतन व संवर्धनासाठी सहाशे सात कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. किल्ल्यावर वीजपुरवठा केला जावा यासाठी संवर्धन आराखड्यामध्ये तरतूद करण्यात आली होती, परंतु पुरातत्त्व विभागाकडून या कामांना परवानगी मिळत नव्हती. अखेर पुरातत्त्व विभागाने या कामासाठी परवानगी दिल्याने वीजपुरवठ्याचा मार्ग सुकर झाला आहे. मागील वर्षभरापासून वीज वितरण विभागाकडून केंद्रीय पुरातत्त्व विभागाकडे गडावरील या कामासाठी लेखी परवानगीही काही तांत्रिक कारणास्तव प्रलंबित होती, परंतु रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिल्ली येथील पुरातत्त्व खात्याकडे पाठपुरावा करून याबाबतची परवानगी मिळवली.

रायगड किल्ला उंचावर असल्यामुळे या ठिकाणी मुसळधार तसेच वादळी पावसाचा मोठा तडाखा बसत असतो. यात गडावरील विजेचे खांब पडण्याचे तसेच विजेच्या तारा, रोहित्र व वितरण पॅनल पडण्याच्या घटना दरवर्षी घडत असतात. ही बाब गांभीर्याने लक्षात घेऊन रायगडावर वीजवितरण कंपनीने सुमारे ११ किलोमीटर लांबीची भूमिगत केबल टाकली आहे. त्यामुळे भविष्यात असा कोणताही प्रकार घडण्याची शक्यता भेडसावणार नाही. तसेच हे नव्याने उभारण्यात आलेले ट्रान्सफॉर्मर डीपी मजबूत असल्याने वीजपुरवठा खंडित होण्याच्या प्रकारासदेखील आळा बसणार आहे.

raigad fort
गेली चाळीस वर्षे CIDCO ची उदासीनता; ९५ गावांतील प्रकल्पग्रस्तांचे काळा दिन आंदोलन

सात कोटींचा निधी

रायगड प्राधिकरणाने किल्ल्यावरील विविध कामांकरिता मंजूर केलेल्या निधीतील सुमारे सात कोटी रुपयांचा निधी वीज वितरण कंपनी या नवीन भूमिगत केबल, रोहित्र व वितरण पॅनल यासाठी खर्च केला जाणार आहे. गेल्या तीन वर्षांपासून रायगड प्राधिकरणामार्फत रायगडावर संवर्धनाची अनेक कामे सुरू आहेत. यामध्ये मिरज वीजपुरवठा संबंधित महत्त्वाची कामेदेखील समाविष्ट आहेत.

रायगडावर चार ट्रान्सफार्मर व डीपी बसवण्याचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित कामेदेखील लवकरच पूर्ण केली जातील.
- सी. एस. केंद्रे (उपकार्यकारी अभियंता, महाड)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com