अघोषित ब्लॉकमुळे प्रवाशांमध्ये नाराजी 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 एप्रिल 2019

रेल्वेमार्गावरील डागडुजीच्या कामांसाठी ब्लॉक घेतला जातो; मात्र त्याबाबत माहिती न दिल्यास प्रवाशांना फटका बसतो.

मुंबई : रेल्वेमार्गावरील डागडुजीच्या कामांसाठी ब्लॉक घेतला जातो; मात्र त्याबाबत माहिती न दिल्यास प्रवाशांना फटका बसतो. अशा प्रकारांमुळे मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गांवरील प्रवाशांचे सतत हाल होत आहेत. अघोषित ब्लॉकमुळे लोकल 30 ते 35 मिनिटे विलंबाने धावत असल्याबद्दल प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.
 
वाढत्या उन्हामुळे रेल्वे रूळ प्रसरण पावतात. अशा रुळांची दुरुस्ती करण्यासाठी तातडीने ब्लॉक घेण्यात येतो. त्याबाबत माहिती दिली जात नसल्यामुळे प्रवासी हैराण झाले आहेत. दिवसभर लोकल 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत असल्यामुळे अनेक फेऱ्या रद्द कराव्या लागत आहेत. हार्बर मार्गावरील सीएसएमटी स्थानकातून रात्रीची शेवटची बेलापूर लोकल तीन दिवस रद्द होत असल्याची तक्रार प्रवाशांनी केली जात आहे. लोकल अचानक रद्द केल्या जात असल्यामुळे प्रवाशांत नाराजी पसरली आहे. रेल्वेकडून उद्‌घोषणा होत नसल्यामुळे स्थानकात रखडपट्टी होते, असे कुर्ल्यातील रहिवासी हेमंत जाधव यांनी सांगितले. दरम्यान, लोकल फेऱ्या रद्द होत नाही, असा दावा रेल्वे अधिकाऱ्यांनी केला.

Web Title: unwilingness in passengers due to undeclared block