esakal | उरण : तालुका कृषी विभागाकडून पिक स्पर्धेसाठी आवाहन
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai

उरण : तालुका कृषी विभागाकडून पिक स्पर्धेसाठी आवाहन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

उरण : कृषी विभागाकडून (Department of Agriculture) खरीप हंगाम २०२१ मधील सर्व साधारण व आदिवासी गटासाठी पीकस्पर्धा आयोजित करण्यात आली असून स्पर्धेत (competition) सर्व शेतकरी (farmer) बांधवांनी भाग घ्यावा, असे आवाहन उरण (Uran) तालुका कृषी अधिकारी शर्मिला जाधव (Sharmila Jadhav) यांनी केले आहे.

पीकनिहाय उत्पादकता तालुक्याच्या सर्वसाधारण उत्पादकतेपेक्षा दीडपट किंवा त्यापेक्षा अधिक आहे अशा शेतकऱ्यांचे पीककापणी प्रयोग घेऊन त्यांच्यामधून पीक स्पर्धेतील शेतकऱ्यांचे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक ठरविण्यात येतील. तालुकास्तरावरील बक्षिसांची रक्कम प्रथम क्रमांक पाच हजार रुपये, द्वितीय क्रमांक तीन हजार रुपये, तर तृतीय क्रमांक दोन हजार रुपये असेल.

येत्या खरीप व रब्बी हंगामात आपल्या तालुक्यात भात तूर व नाचणी या पिकांकरिता स्पर्धेचे आयोजन केले असून या करता दहा गुंठे क्षेत्रावर लागवड असणे आवश्यक आहे. ज्यांच्या नावावर शेती आहे व ते स्वतः शेती कसत आहेत असे सर्व शेतकरी या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकतात. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्यांला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत सहभाग नोंदविता येईल स्पर्धे मध्ये सहभाग नोंदविण्या करता विहीत नमुन्यातील अर्ज तालुका कृषी अधिकारी कार्यालय उरण येथे स्वीकारले जाणार आहेत.

हेही वाचा: शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज : कर्जमाफी रक्कम 1154 कोटी 25 लाख रुपये जमा 

याकरीता रक्कम रुपये तीनशे प्रवेश शुल्क असून अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालय उरण कार्यालयाशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे सदर स्पर्धेमध्ये सहभागाची संधी ३१ ऑगस्ट २०२१ अखेर आहे पीक कापणी प्रयोग घ्यावयाची किमान संख्या सर्वसाधारण गटासाठी झिरो पाच व आदिवासी गटासाठी झिरो चार आहे.पीक स्पर्धेतील शेतकऱ्यांनी आपल्या स्पर्धा प्लॉटच्या कापणी तारखा चालू परिस्थिती पाहून निश्चित कराव्यात व त्याबाबत लेखी सूचना तालुका कृषी अधिकारी यांना आठ दिवस अगोदर द्यायच्या आहेत.

मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक व कृषी सहाय्यक हे कार्यक्षेत्रातील स्पर्धकांशी सतत संपर्क साधून प्लॉट कापणी बाबत जरूर ती सिद्धता स्पर्धेकांच्या प्लॉटवर ठेवण्याबाबत कार्यवाही करतील पीक स्पर्धेत भाग घेतलेल्या स्पर्धकांनी माघार घ्यावयाची असल्यास कापणी पूर्व १५ दिवस अगोदर माघार घेतल्याचे सर्व संबंधित अधिकाऱ्यास लेखी कळवावे तसेच माघार कोणत्या कारणासाठी घेतली हे स्पष्ट नमूद करावे. त्याच प्रमाणे उरण तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवावा असे आवाहन तालुका कृषी कार्यालय उरण यांच्या वतीने करण्यात आले आहे.

loading image
go to top