कोप्रोलीत बालिकेचे केस कापल्याची घटना

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 सप्टेंबर 2017

उरण - तालुक्‍यात एका बालिकेचे केस कापल्याची घटना उघडकीस आली आहे. याआधी एका महिलेची वेणी कापण्यात आली होती.

उरण - तालुक्‍यात एका बालिकेचे केस कापल्याची घटना उघडकीस आली आहे. याआधी एका महिलेची वेणी कापण्यात आली होती.

कोप्रोली येथील 10 वर्षांच्या मुलीचे केस शनिवारी (ता.2) दुपारी कापल्याची घटना घडली. ही मुलगी पाचवीत शिकत असून, दुपारी झोपलेली असताना तिचे केस कापण्यात आल्याचे तिच्या कुटुंबीयांनी सांगितले. या प्रकारामागील गुंता सोडवण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे. पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी अद्याप पोलिसांत तक्रार दिलेली नाही. काही दिवसांपूर्वी भेंडखळ येथील परप्रांतीय महिलेची वेणी कापण्यात आली होती. या प्रकाराबाबत वेगवेगळ्या अफवा पसरवण्यात येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Web Title: uran mumbai news hair cutting case