उरणमध्ये परिवर्तन होणारच

जसखार येथील प्रचारसभेत मार्गदर्शन करताना महेश बालदी.
जसखार येथील प्रचारसभेत मार्गदर्शन करताना महेश बालदी.

उरण : शिवसेनाप्रमुखांनी लढायला शिकविलेली शिवसेना आता रडायला लागली आहे. उरणमध्ये विरोधकांनी कोणतीही विकासकामे केली नाहीत. केवळ आश्‍वासने देऊन जनतेची दिशाभूल केली आहे. मतदार विकासकामांच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे या निवडणुकीत परिवर्तन होणार हे निश्‍चित, असा विश्‍वास महेश बालदी यांनी व्यक्‍त केला. उरण विधानसभा मतदारसंघातील उमेदवार महेश बालदी यांची प्रचारसभा सोमवारी (ता.१४)  रत्नेश्वरी देवीच्या मंदिरासमोरील मैदानात संपन्न झाली. त्या वेळी ते बोलत होते. 

या वेळी माजी आमदार देवेंद्र साटम, ज्येष्ठ भाजप नेते पी. जी. पाटील, उरण तालुकाध्यक्ष रवि भोईर, तालुका महिला अध्यक्षा संगीता पाटील, नगराध्यक्षा सायली म्हात्रे, शहर अध्यक्ष कौशिक शहा, सुधीर घरत, घारापुरीचे माजी सरपंच राजेंद्र पडते, ॲड. पराग म्हात्रे, आरपीआय तालुकाध्यक्ष संजय गायकवाड आदी उपस्थित होते.
यापुढे महेश बालदी यांनी विरोधकांवर टीका करताना सांगितले की, पनवेलचे आमदार मतदारसंघात कोट्यवधी रुपयांची कामे केल्याचे ठामपणे लोकांना सांगत आहेत; मात्र विरोधकांकडे विकासकामे सांगायला काहीच नाही. कर्नाळ्याचे नाव वापरून राजकारण करणाऱ्यांकडून आत्तापर्यंत पर्यटनाच्या दृष्टीने कर्नाळा किल्ल्यावर कोणतेही काम करण्यात आले नाही. कर्नाळा बॅंकेतील गैरव्यवहार उघड झाला आहे. भाजपच्या माध्यमातून ग्राहकांचे पैसे मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल. उरणमध्ये केवळ प्रचारासाठी येणाऱ्या विरोधकांना जनताच उत्तर देईल. भविष्यात उरणचा विकास होणार असून विरोधकांची शिट्टी वाजविण्यासाठी शिट्टी निशाणी घेतली आहे. निवडणुकीत घासून नाही; तर ठासून येणार आहे, असे सांगत विरोधकांसमोर बालदी यांनी मोठे आव्हान उभे केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com