'उरी : द सर्जिकल स्ट्राईक' चित्रपटातील अभिनेत्याचा मृत्यू 

वृत्तसंस्था
बुधवार, 10 एप्रिल 2019

मुंबई : अभिनेता विकी कौशलची मुख्य भूमिका असलेल्या 'उरी : द सर्जिकल स्ट्राईक' चित्रपटातील बॉलिवूड अभिनेते नवतेज हुंडाल यांचे निधन झाले. हुंडाल यांनी या चित्रपटात गृहमंत्र्यांची भूमिका साकारली होती.

'सिने अँड टीव्ही आर्टिस्ट्स असोसिएशन' (सिंटा) च्या ट्विटर हँडलवरुन हुंडाल यांच्या निधनाची बातमी सांगण्यात आली आहे. जोगेश्वरीमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती देण्यात आली.

नवतेज हुंडाल यांच्या पश्चात पत्नी नीलम आणि दोन मुली आहेत. त्यांची कन्या अवंतिका हुंडाल ही 'ये है मोहब्बते' या प्रसिद्ध टीव्ही मालिकेत मिहिकाची व्यक्तिरेखा साकारत आहे.

नवतेज हुंडाल यांनी अभिनय प्रशिक्षण शिबीरंही घेतली आहेत. संजय दत्तसोबतचा 'खलनायक' (1993), 'तेरे मेरे सपने' (1996) यासारख्या चित्रपटांसोबत 'भारत एक खोज' या टीव्ही शोमध्ये ते झळकले होते.

Web Title: Uri actor Navtej Hundal dies in Mumbai