'बाईंच्या डोक्यावर अपघात झाला आहे का हो भाऊ'; उर्मिला मातोंडकरांचा कंगनाला टोला

'बाईंच्या डोक्यावर अपघात झाला आहे का हो भाऊ'; उर्मिला मातोंडकरांचा कंगनाला टोला

मुंबई - मुंबईत पोहचल्यानंतर कंगना रानौतने सिद्धिविनायक गणपती मंदिरात दर्शन घेतले. तिच्यासोबत बहिण रंगोली आणि भाऊ वहिनी सुद्धा होती. यावेळी कंगनाने नाव न घेता ठाकरे सरकारला डिवचले आहे. त्यामुळे शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकरनेही कंगनाचे नाव न घेता प्रत्युत्तर दिले आहे.

सिद्धिविनायक मंदिराबाहेर येताच  कंगनाने 'जय महाराष्ट्र' असे म्हटले. त्याठिकाणी असलेल्या प्रसारमाध्यमांशी बोलतानांना कंगना म्हणाली की, 'मला मुंबईत राहण्यासाठी कोणाच्या परवानगीची गरज नाही. फक्त गणपती बाप्पाचा आशीर्वाद आणि परवानगी हवी आहे. ती मिळाली आहे. आणखी कोणाकडेही परवानगीची गरज नाही.' मंदिराबाहेरील फोटो कंगनाने ट्विटरवही शेअर केले आहे.

त्यात ती म्हटली की,  ' माझ्या लाडक्या मुंबई शहरासाठी उभं राहिल्यानंतर शत्रुत्वाचं प्रमाण आश्चर्यचकित करणारं होतं  आज मी मुंबादेवी आणि सिद्धिविनायक मंदिरात जाऊन आशीर्वाद घेतला. मला सुरक्षित  आणि स्वागत केल्यासारखं वाटत आहे.'

कंगनाचे हे ट्विट ठाकरे सरकारला नाव न घेता डिवचणारे आहे. त्यामुळे अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी कंगनाचे नाव न घेता, आपल्या खास शैलीत कंगनाचा समाचार घेतला आहे. त्यांनी ट्विट करीत म्हटले की, ' बाईंच्या डोक्यावर अपघात झाला आहे का हो भाऊ.' मातोंडकरांच्या ट्विटवर असंख्य नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यामुळे यापुढेही कंगनाच्या टीकांच्या विरोधात उर्मिला मातोंडकरांची तोफ धडाडणार असे संकेत मिळत आहेत.

Urmila Matondkar criticizes Kangana Ranaut from tweet

------------------------------------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com