मराठा आरक्षण मंजूर झाल्याने वाशी भाजपकडून जल्लोष

नेताजी दि. नलवडे
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

वाशी : मराठा समाजाला 16 टक्के आरक्षणाचे विधयेक गुरुवार (ता.२७) रोजी विधानसभेत मंजूर झाल्यानंतर शुक्रवार (ता.३०) रोजी पारगाव ता.वाशी येथे भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांच्या उपस्थितीत एकमेकांना पेढे भरवून व फटाक्यांची आतिषबाजी करुन जल्लोष करण्यात आला. यावेळी प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

भाजप तालुका अध्यक्ष सचिन इंगोले जिल्हा उपाध्यक्ष महादेव आखाडे माजी सभापती लक्ष्मीकांत आटुळे डॉ.अनंत कुलकर्णी राजाभाऊ कोकणे, विकास तळेकर, नवनाथ मोटे, गणेश बोराडे, रामदास मोटे, भरत गायकवाड, आश्रुबा आखाडे, बबन वायसे, बदरु शेख, अॅड. मोटे, अशोक काटवटे, विठ्ठल मोटे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Vaashi BJP Celebration after Maratha Reservation