भटक्‍या कुत्र्यांचे "पॉज'कडून लसीकरण 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 मे 2017

ठाणे - रस्त्यावरील भटक्‍या कुत्र्यांसह इतर प्राण्यांना रेबीजसारख्या आजारांची लागण होते. यासाठी प्लॅन्ट ऍन्ड ऍनिमल वेल्फेअर असोसिएशन (पॉज)ने लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. शनिवारी मध्यरात्री ठाणे रेल्वेस्थानक परिसरातील 41 कुत्र्यांना रेबीजची लस देण्यात आली. पॉज संस्थेचे आठ स्वयंसेवक आणि एक पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या साथीने विशेष लसीकरण मोहीम राबवल्याचे संस्थेचे नीलेश भणगे यांनी सांगितले. 

शहरात भटक्‍या कुत्र्यांची संख्या वाढत असून, त्यांना रेबीजची लागण होण्याची शक्‍यता आहे. याचा मानवी आरोग्यालाही धोका संभवतो. "पॉज'तर्फे दर वर्षी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रेबीज लसीकरण मोहीम घेतली जाते. ठाणे शहरासह उपनगरात भटक्‍या कुत्र्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यांना संपर्कातून विविध आजारांची लागण होते. रेबीज झालेला कुत्रा माणसाला चावल्यास त्याचा मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे शहरी कुत्र्यांना "अँटी रेबीज लस' देण्याचा उपक्रम "पॉज'ने मागील काही वर्षांपासून सुरू केला. विविध पालिकांकडून कुत्र्यांचे निर्बीजीकरण केले जाते. त्याचवेळी त्यांचे लसीकरण करण्यात येते; मात्र भटक्‍या कुत्र्यांचे लसीकरणच होत नसल्याने त्यांच्यासह परिसरातील सर्वसामान्यांच्या जीवालाही धोका निर्माण होतो. त्यामुळेच ही विशेष रेबीजविरोधी मोहीम हाती घेण्यात येत असल्याचे संस्थेतर्फे सांगण्यात आले. 

पुढील टप्प्यामध्ये कल्याण रेल्वेस्थानकात 
कल्याण रेल्वेस्थानक परिसरातील भटक्‍या कुत्र्यांचे प्रमाण वाढले आहे. यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून "पॉज'तर्फे यांचे लसीकरण येत्या आठवड्यात केले जाणार आहे. दरम्यान, कोपर, ठाकुर्ली आणि डोंबिवली रेल्वेस्थानक परिसरातील भटक्‍या कुत्र्यांचे लसीकरण केल्याची माहिती संस्थेचे संस्थापक नीलेश भणगे यांनी दिली. 

Web Title: Vaccination of street Dogs