वाड्याची कन्या 'मिसेस इंडिया'च्या अंतिम फेरीत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 जुलै 2018

महाराष्ट्र राज्यातून पुणे येथे झालेल्या स्पर्धेत डॉ. सुतेजा विक्रम स्वामी (पवार) यांनी प्रथम क्रमांकाचे नामांकन मिळवून मिसेस इंडियाच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळविला आहे.

वाडा - वाडा येथील निवृत्त शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते ए. टी. पवार यांची कन्या व बदलापूर, जि. ठाणे येथील डॉ. विक्रम स्वामी यांची पत्नी डॉ. सुतेजा विक्रम स्वामी (पवार) यांची मिसेस इंडियाच्या अंतिम फेरीत महाराष्ट्रात राज्यातून निवड झाली आहे. 
       
देशपातळीवर होणाऱ्या या स्पर्धेत देशभरातील 45 महिला विविध राज्यांचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र राज्यातून पुणे येथे झालेल्या स्पर्धेत डॉ. सुतेजा विक्रम स्वामी (पवार) यांनी प्रथम क्रमांकाचे नामांकन मिळवून मिसेस इंडियाच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळविला आहे. दि. 12 ते 15 जुलै दरम्यान दिल्ली येथे होणाऱ्या अंतीम फेरीच्या स्पर्धेत त्या सहभागी होणार आहेत.

डॉ. सुतेजा यांचा जन्म पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील निचोळे या गावी झाला असून त्या दंतरोग तज्ञ आहेत. मुळच्या पवार या शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या डॉ. सुतेजा यांचा सन 2011 साली बदलापूर येथील दंतरोग तज्ञ डॉ. विक्रम स्वामी यांच्याशी विवाह झाला.
     
डॉ‌. सुतेजा या शालेय जीवनापासूनच हुशार असून इ. 10 वीच्या परिक्षेत त्या तालुक्यांत प्रथम तर मुंबई बोर्डामध्ये 12 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या होत्या. ग्रामीण भागात जन्मलेल्या व देशपातळीवरील अशा स्पर्धेमध्ये अंतिम फेरीत दाखल होणाऱ्या डॉ. सुतेजा या पहिल्याच असून महाराष्ट्रभरातून त्यांच्या विजयासाठी त्यांच्या फेसबुक व इन्स्टाग्राम पेजवर जाऊन त्यांना मोठ्या प्रमाणात लाईक मिळत आहेत. तसेच सोशल मिडियावर त्यांच्या लिंकवर जाऊन लाईक करण्यासाठी सर्व स्तरांतून आवाहन केले जात आहे. तसेच त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.
 

 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: Vadas daughter went to Misses India final