वाफेघर गावचा पूल धोकादायक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 ऑगस्ट 2019

मुंबई : सुधागड तालुक्‍यातील वाफेघर गावाजवळील नदी पूल धोकादायक झाला आहे. पुलाला जोडणाऱ्या रस्त्याची माती रविवारी (ता. ४) वाहून जाऊन तेथे भगदाड पडले आहे. हे भगदाड न बुजविल्यास गावाचा संपर्क तुटण्याची शक्‍यता आहे. 

मुंबई :  सुधागड तालुक्‍यातील वाफेघर गावाजवळील नदी पूल धोकादायक झाला आहे. पुलाला जोडणाऱ्या रस्त्याची माती रविवारी (ता. ४) वाहून जाऊन तेथे भगदाड पडले आहे. हे भगदाड न बुजविल्यास गावाचा संपर्क तुटण्याची शक्‍यता आहे. 

दोन-तीन वर्षांपासून वाफेघर पुलाची दुरवस्था झाली आहे. जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. अनेक ठिकाणी या पुलाचे बांधकाम कमकुवत झाले आहे. दोन वर्षांपासून ग्रामस्थच या पुलाची डागडुजी करत आहेत.

मुसळधार पावसामुळे पुलाला जोडणाऱ्या रस्त्याची माती वाहून गेली आहे. त्यामुळे तिथे भगदाड पडले. या भगदाडमुळे नदीचे पाणी वर येत असल्याचे ग्रामस्थ राजेश बेलोसे यांनी सांगितले. येथील माती पूर्णपणे वाहून गेल्‍याने तिथे मोठा खड्डाही पडला आहे. त्यामुळे येथून आता एसटी बस जाणे अवघड आहे. यामुळे ग्रामस्थांची मोठी गैरसोय होणार असल्याचे ग्रामस्थ परेश शिंदे यांनी सांगितले. 

ग्रामस्थ स्वखर्चाने दोन वर्षांपासून पुलाची देखभाल व दुरुस्ती करत आहेत. आताही आम्हालाच हा खड्डा भरून पुलाची डागडुजी करावी लागणार आहे. जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाची वेळीच डागडुजी व दुरुस्ती करण्याची आवश्‍यकता आहे. अन्यथा मोठी दुर्घटना होण्याचा धोका असल्याचे सरपंच रुचिता बेलोसे यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vafeghar village pool dangerous