मराठा मोर्चाहून परतताना अपघातात तीन युवक ठार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017

वैजापूर - मुंबई येथील मराठा क्रांती मोर्चाहून औरंगाबाद परिसरातील वाळूज येथे घरी परतत असताना मोटार व ट्रकची धडक होऊन तीन युवक जागीच ठार झाले.

वैजापूर - मुंबई येथील मराठा क्रांती मोर्चाहून औरंगाबाद परिसरातील वाळूज येथे घरी परतत असताना मोटार व ट्रकची धडक होऊन तीन युवक जागीच ठार झाले.

वैजापूरपासून जवळ असलेल्या खामगाव पाटी शिवारात (ता. येवला) गुरुवारी हा अपघात सकाळी साडेसातच्या सुमारास ट्रक व मोटार यांची धडक झाली. या ठिकाणी अन्य एक मोटारही धडकली. ट्रक औरंगाबादहून नाशिककडे जात होता, तर मोटार औरंगाबादकडे चालली होती. मोटारीतील नारायण कृष्णा थोरात (वय, 21, रा. गाजगाव, जि. औरंगाबाद), हर्षल अनिल घोलप (वय,28, रा. गावठाण, रुकडी पुणे) आणि अविनाश नवनाथ गव्हाणे अशी मृतांची नावे आहेत. गौरव प्रजापती (वय, 23, रा. औरंगाबाद) व उमेश भोपाल भगत हे गंभीर जखमी झाले.

Web Title: vaijapur mumbai news three youth in accident