मुसळधार पावसाने वज्रेश्वरी रस्ता गायब

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 जून 2018

वज्रेश्वरी - भिवंडी तालुक्यातील महत्त्वाचे अशा वज्रेश्वरी  येथील मुख्य दळण-वळण असणाऱ्या मुख्य रस्ता गेल्या वर्षभरपासुन प्रशासनाच्या दुर्लक्षित पणामुळे पूर्ण खराब झाला. कुठलाही डागदूजी न करता ठेकेदारने साइड ड्रेनेज अर्धवट खनून सोडल्याने होता. नव्हता तोही रस्ता काल पासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने वाहून गेला आहे. त्यामुळे येथे नवीन नाला तयार झाला असल्याने अपघाताची मलिका सुरु झाली आहे.

ठाणे जिल्ह्यातील नामांकित गरम पाण्याचे कुंड,व वज्रेश्वरी देवी, स्वामी नित्यानंद मंदिर हे तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळ म्हणून जगाच्या नकाशावर प्रसिद्ध आहेत. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग व शासनाच्या दुर्लक्षित पणामुळे येथील रस्ता मोठे डोके दुखी ठरली असून, प्रवासी व विद्यार्थी ना येथून जाताना जीव मुठीत घेउन प्रवास करावा लागत आहे. प्रशासनाने येथील सीमेंट रास्ता मंजूर केला व वर्क आर्डर निघुन चार महीने उलटून गेले तरी येथील रस्ताचे काम सुरु न करता उलट येथील रस्ताकड़ेचे गटारी उघड़ी करून ठेकेदारने मनमानी केली आहे. 

दरम्यान येथिल वज्रेश्वरी गावातुन जाणारा हा मुख्य रस्ता सखल भागात येत असल्याने काल पासून येथे सुरु असलेल्या मुसळधार पावसाने रस्ता वाहून गेला असून या ठिकाणी नाला तयार होऊन खळखळ वाहत आहे. त्यामुळे या आठवड्यात कित्येक जण दुचाकी वरुन पडूंन गंभीर जख्मी झाले. याबाबत गणेशपुरी पोलीस ठाणे मार्फ़त संबंधित विभागला पत्रव्यवहार देखील करण्यात आला आहे. 

मात्र मुजोर प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. येथील सामाजिक कार्यकर्ते सुनील देवरे, भूपेंद्र शाह, प्रसाद सुवर्णा, दीपक पुजारी, मिलिंद काम्बले येथील वज्रेश्वरी अंबाड़ी रिक्शा संघटना याबाबत येथे लवकरच आंदोलन करण्याच्या तयारित आहे. 

लोकप्रतिनिधि येथे निवडून येतात मात्र नंतर अंतर्गत राजकारण मुळे येथील जनतेस वेठीस धरतात. विद्यमान खासदार कपिल पाटील तसेच शिवसेनेचे आमदार शांताराम मोरे यांनी या भागा कड़े दुर्लक्ष केले असल्याची भावना येथील नागरिकांमध्ये झाली आहे. तर संबंधीत ठेका घेतलेल्या ठेकेदारवार त्वरित करवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.

Web Title: Vajreshwadi road disappears with heavy rain