वज्रेश्वरी देवस्थानाचा गलथान कारभार 

दीपक हिरे
सोमवार, 24 डिसेंबर 2018

वज्रेश्वरी - ठाणे जिल्यातील वज्रेश्वरी येथें असलेल्या  वज्रेश्वरी योगिनी देवी संस्थानच्या परिसरात हायमास्ट दिवा, व कचऱ्याचे साम्राज्य यामुळे येथील परीसर अंधकारमय झाला आहे. स्वच्छता अभियानाचे तीन तेरा वाजले आहे. तरी या देवस्थानामध्ये धर्मदाय आयुक्तांनी लक्ष घालून येणाऱ्या भाविकांची गैरसोय दूर करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गणेशपुरी विभाग अध्यक्ष सुनील देवरे यांनी केली आहे.

वज्रेश्वरी देवस्थानातील पैशाच्या अपहार प्रकरणी गेल्या काही महिन्यांपासुन येथील विश्वस्तांची चौकशी सुरू आहे. असे असताना आता येथील व्यवथापनाचे देखील तीन तेरा वाजले असून मंदिर परिसरातच जिथे 'स्वछता राखा'असे फलक लावले आहे. तिथेच फुलहार, नारळवाटी, पाने, प्रसाद आदी कचरा टाकून देण्यात आले आहे. त्यामुळे येथील व्यवस्थपन देखील ढासळलेले आहे. त्याचप्रमाणे मंदिरा समोर दीप माळेजवळ भिवंडी येथील महापौर यांनी देवीस हायमास्ट दान केले होते. मात्र वीज बिल जास्त येत असल्या कारणाने देवस्थानाने हायमास्ट गेले सहा महिने पासून बंद केला. त्यामुळे मंदिर परिसर अंधारात असल्याने भक्ताची गैरसोय होत आहे. धर्मदाय आयुक्तांनी या प्रश्नांरडे विषेश लक्ष द्यावे अशी मागणी मनसे गणेशपुरी विभाग प्रमुख सुनील देवरे यांनी केली आहे.

Web Title: Vajreshwari Devasthanan's bad administration