वाकोल्यातील पादचारी पूल मोजतोय अखेरची घटका

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 जून 2018

प्रभादेवी - सांताक्रुज –वाकोला येथील हंस भूग्रा मार्गावरील पादचारी पुलाची पुरती दुरवस्था झाली असून वेळीच तो दुरुस्त केला नाही तर हा पूल कोसळून महाड पुलासारखी दुर्घटना घडू शकते पालिका मात्र याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप येथील स्थानिकांनी केला आहे.

प्रभादेवी - सांताक्रुज –वाकोला येथील हंस भूग्रा मार्गावरील पादचारी पुलाची पुरती दुरवस्था झाली असून वेळीच तो दुरुस्त केला नाही तर हा पूल कोसळून महाड पुलासारखी दुर्घटना घडू शकते पालिका मात्र याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप येथील स्थानिकांनी केला आहे.

सांताक्रुज-वाकोला येथील हंस भूग्रा मार्गावरील पालिकेच्या एच पूर्व हायड्रोलिक अभियंता यांच्या अख्त्यारातील हा पादचारी पूल खूप जुना असून तो जीर्ण झाल्यामुळे वेळीच त्याची डागडुजी करणे अनिवार्य आहे.

वाकोला नाल्यालगत असलेल्या या पुलावरून अनेक पादचारी ये-जा करीत असतात सध्या त्याठीकाणी मेट्रोचे काम सुरु असल्याने त्यामार्गावरून संध्याकाळच्या वेळेस भरपूर वाहतूक कोंडी होते असे येथील नागरिकांनी सांगितले.

मेट्रोच्या कामामुळे मुंबई विद्यापीठ ते हंस भूग्रा मार्गापर्यंत या पादचारी पुलावरून जाताना जीव मुठीत घेवून जावे लागते त्या परिसरात असलेले ऑफिसचे कर्मचारी, मुंबई विद्यापीठातील विद्यार्थी व कर्मचारी यांना याच पुलाचा वापर करावा लागतो.असे काही विद्यार्थ्यांनी सांगितले.

संध्याकाळच्या वेळेस खूप वाहतूक कोंडी असल्यामुळे अनेक दुचाकीस्वार व रिक्षा या पादचारी पुलावरून गाडी घेवून जातात पूल खचला तर थेट नाल्यात पडण्याची भीती स्थानिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

पादचारी पुलाच्या दुरुस्ती बाबत स्थायी समितीत विषय मांडला असून याचा सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे लवकरच या पुलाची दुरुस्ती पालिकेकडून करून घेण्यात येईल असे नगरसेवक सदानंद परब यांनी सांगितले.

Web Title: vakola Pedestrian bridge condition