'व्हॅनिटी व्हॅन' संपामुळे चित्रीकरणात अडचणी

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

मुंबई - करातून सवलत देण्याच्या मागणीसाठी "व्हॅनिटी व्हॅन' कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून बेमुदत संप सुरू केला. त्यामुळे मालिका आणि चित्रपटांच्या चित्रीकरणावर काहीअंशी परिणाम झाला आहे. कर्मचाऱ्यांच्या संघटनेने आझाद मैदान पोलिसांना निवेदन सादर केले. कलाकारांनी मात्र पाठिंबा दिलेला नाही, असे "व्हॅनिटी व्हॅन' कर्मचारी संघटनेतर्फे सांगण्यात आले.

महाराष्ट्रात "व्हॅनिटी व्हॅन'च्या मालकांना दरमहा पाच हजार रुपये प्रतिचौरस फूट या दराने कर भरावा लागतो. हा कर कमी करावा, या मागणीसाठी "व्हॅनिटी व्हॅन' कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात संप सुरू झाल्यामुळे अनेक चित्रपटांच्या चित्रीकरणात अडचणी येत आहेत. अक्षय कुमारच्या "केसरी' चित्रपटाचे चित्रीकरण फिल्मसिटीमध्ये; तर अजय देवगणच्या "तानाजी' चित्रपटाचे फिल्मिस्तानमध्ये चित्रीकरण सुरू आहे. त्या ठिकाणी मेकअप रूम तयार केल्या असल्या, तरी "व्हॅनिटी व्हॅन'मधील सोयी-सुविधा उपलब्ध नाहीत, असे "व्हॅनिटी व्हॅन' कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष केतन रावल यांनी सांगितले. संघटनेने कर कमी करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना ट्‌विटद्वारे केली आहे, असे त्यांनी सांगितले.

Web Title: Vanity Van Strike Shooting Problem