Mumbai Accident : वरळी सि-फेस अपघात प्रकरणी आरोपी सुमेरचा रक्त चाचणी अहवाल उघड

वरळी सि-फेसवर झालेल्या अपघाता प्रकरणी आरोपी वाहनचालक सूमेर मर्चंटला सोमवारी मुंबईतील दंडाधिकारी न्यायलयाने केलेल्या सुनावणीत जामीन नामंजूर केला आहे.
blood test
blood testsakal
Summary

वरळी सि-फेसवर झालेल्या अपघाता प्रकरणी आरोपी वाहनचालक सूमेर मर्चंटला सोमवारी मुंबईतील दंडाधिकारी न्यायलयाने केलेल्या सुनावणीत जामीन नामंजूर केला आहे.

मुंबई - वरळी सि-फेसवर झालेल्या अपघाता प्रकरणी आरोपी वाहनचालक सूमेर मर्चंटला सोमवारी मुंबईतील दंडाधिकारी न्यायलयाने केलेल्या सुनावणीत जामीन नामंजूर केला आहे. तसेच कोर्टात झालेल्या सुनावणीत आरोपी सुमेरच्या रक्ताच्या चाचणीचा अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला. आरोपीने मद्याच्या नशेत चारचाकी चालवल्याचे आरोपीच्या रक्ताच्या तपासणीच्या अहवालात स्पष्ट झालं आहे.

आरोपी सुमेरची दंडाधिकारी न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केल्यानंतर आरोपीने जामीन अर्ज दाखल केला होता. वरळी सी फेस येथे 19 मार्च रोजी रविवारी सकाळी 42 वर्षीय राजलक्ष्मी राजकृष्णन या महिलेचा सुमेर मर्चंटच्या गाडीने धडक दिल्याने मृत्यू झाला होता. याप्रकरणी वरळी पोलिसांनी गुन्हा दाखल करून 23 वर्षीय चालका सुमेर मर्चंटला अटक केली होती. 3दिवस पोलीस कोठडीत राहिल्यानंतर भोईवाडा न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली.

रक्त चाचणी अहवाल सादर

सोमवारी मुंबईतील भोईवाडा दंडाधिकारी न्यायालयाने आरोपी सुमेरच्या जामिनावर सुनावणी केली.वरळी पोलिसांनी सुनावणीदरम्यान न्यायालयाला सांगितले की, त्यांना कलिनाच्या विज्ञान प्रयोगशाळेतून आरोपीच्या रक्ताच्या चाचणीचा अहवाल मिळला आहे. या अहवालामध्ये "सुमेरने दारूचे सेवन केले होते" याची पुष्टी केली आहे.तसेच, ज्या प्रमाणात अल्कोहोल आरोपीच्या रक्तत आढळले ते मर्यादेच्या दुप्पट आहे. आता आरोपींला जामीन मिळविण्यासाठी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज करावा लागणार आहे.

blood test
Mumbai Crime : दर्शन सोळंकी आत्महत्या प्रकरण; सूसाईड नोट एसआयटीच्या हाती

घटनाक्रम

भरधाव वेगाने येणाऱ्या मोटरगाडीने दिलेल्या धडकेत 42 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. राजलक्ष्मी राजकृष्णन असे महिलेचे नाव होते. या अपघातात गाडीचा चालकही जखमी झाला होता. याप्रकरणी वरळी पोलिसांनी गुन्हा दाखल करून 23 वर्षीय सुमेर मर्चंट या चालकाला अटक केली होती. सुमेरच्या घरी शनिवारी 18 मार्चला रात्री मित्रांची पार्टी झाली होती. त्यानंतर तो मित्राला सोडायला शिवाजी पार्क येथे गेला असता त्याने हा अपघात केल्याचे तपासात उघडकीस आले. सुमेर मर्चंट हा ताडदेव येथे आपले पालक आणि धाकट्या भावासोबत रहात असून त्याचे पालक हिमाचल प्रदेशात गेल्याने त्याने आपल्या घरी मित्रासाठी पार्टी ठेवली होती.

blood test
Railway Police Force : आरपीएफकडून ' मिशन गर्दुल्ले'!

आयटी कंपनीत उच्च पदस्थ अधिकारी

राजलक्ष्मी राजकृष्णन मुंबईतील आय टी कंपनीत सीईओ पदावर कार्यरत होत्या.त्या माटुंगा पूर्वेकडील बालाजी गार्डन टॉवर येथील सातव्या मजल्यावर राहतात, त्यांनी अलीकडेच टाटा मॅरेथॉनमध्येही भाग घेतला होता, रविवारी सकाळी नेहमीप्रमाणे त्या मॉर्निंग वॉक करण्यासाठी घराबाहेर पडल्या. वरळी सी फेसवर चालत जात असताना सकाळी साडेसहाच्या सुमारास भरधाव वेगाने येणाऱ्या कारचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे कार राजलक्ष्मी यांना धडक देत दुभाजकावर आदळली. या धडकेत त्या दूरवर फेकल्या गेल्या. यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्याने स्थानिक आणि पोलिसांच्या मदतीने त्यांना नायर रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी दाखल करण्यापूर्वी मृत घोषित केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com