वरवरा राव यांना नानावटी रुग्णालयात हलवले; मानवाधिकार आयोगाने राज्याला दिले होते आदेश...

मिलिंद तांबे | Sunday, 19 July 2020

सामाजिक कार्यकर्ते आणि कवी असलेले वरवरा राव हे 80 वर्षाचे असून, एल्गार परिषद प्रकरणात ते आरोपी आहेत. त्याप्रकरणी ते तळोजा तुरुगांत ठेवण्यात आले होते. काही दिवसापासून प्रकृती खालावल्यामुळे त्यांना जे जे रुग्णालयात हलवण्यात आले.

मुंबई : पुण्यातील एल्गार परिषद प्रकरणात अटकेत असलेले कवी वरवरा राव यांनी कोव्हिडची लागण झाल्यानंतर जे.जे.रुग्णालयात ठेवण्यात आले होते. पुढील उपचारासाठी नानावटी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

प्लेगपासून बचावलेल्या बीआयटी चाळींमध्ये कोरोनाचे संकट; जाणून घ्या 120 वर्षे जुन्या बीआयटी चाळींविषयी...

वरवरा राव यांना चांगले उपचार मिळावेत यासाठी मानवाधिकार आयोगाकडे तक्रार करण्यात आली होती. त्याची दखल घेऊन वरवरा यांना सर्व सुविधा असलेल्या खासगी रुग्णालयात पाठवण्यात यावे, असे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने राज्य सरकारला म्हटले आहे.

अॅण्ड्रॉईड मोबाईलधारकांनो सावधान! हॅकर्सनी विकसित केला मालवेअर...

सामाजिक कार्यकर्ते आणि कवी असलेले वरवरा राव हे 80 वर्षाचे असून, एल्गार परिषद प्रकरणात ते आरोपी आहेत. त्याप्रकरणी ते तळोजा तुरुगांत ठेवण्यात आले होते. काही दिवसापासून प्रकृती खालावल्यामुळे त्यांना जे जे रुग्णालयात हलवण्यात आले.  गेल्या आठवड्यात राव यांच्या कुटुंबियांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांची प्रकृती ढासळत असल्याचा आरोप केला होता. राव यांना तातडीने वैद्यकीय मदत देण्याची मागणी या पत्रकारपरिषदेच्या माध्यमातून करण्यात आली होती. यापूर्वी मे महिन्यात तळोजा तुरुंगात राव चक्कर येऊन कोसळल्याने त्यांना जे जे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
---
संपादन : ऋषिराज तायडे