वसईच्या समुद्र किनाऱ्यावर सुटकेसमध्ये आढळला शिरच्छेद झालेला महिलेचा मृतदेह !

female dead body
female dead bodysakal media

नालासोपारा : वसईच्या भुईगांव समुद्र किनारी (Vasai) एका सुटकेस मध्ये अनोळखी महिलेचा मृतदेह (Female dead Body) मिळाला आहे. या महिलेची हत्या करून, मुंडक धडापासून वेगळं करून तो मृतदेह सुटकेस मध्ये भरून समुद्रात फेकलेला असावा असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. वसईच्या भुईगाव समुद्र किनारी (Bhuigaon Beach) आज सोमवार ता 26 रोजी  दुपारी 12 च्या सुमारास हा मृतदेह मिळाला आहे. या मृतदेहाची कोणतीही ओळख पटलेली नसून , मृतदेह ताब्यात घेऊन जेजे रुग्णालयात शवविच्छेदन (Postmortem) साठी पाठविण्यात आला आहे. याबाबत वसई पोलीस ठाण्यात (Vasai Police) अज्ञात आरोपी विरोधात हत्येचा गुन्हा (Murder Case) दाखल करून, तपासासाठी स्वतंत्र 4 पथक रवाना केले असल्याची माहिती वसई चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणराव करपे यांनी दिली आहे. ( Vasai Bhuigaon beach female dead body in Briefcase fir in vasai police station-nss91)

female dead body
BMC : स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण अधिक

वसई पोलीस ठाणे हद्दीत भुईगाव समुद्र किनाऱ्या वर एक सुटकेस स्थानिक पोलीस पाटील यांच्या निदर्शनास आली होती. सुटकेस मधून दुर्गंधी येत असल्याने, त्यात मृतदेह असावा असा अंदाज करून,  पोलीस पाटील यांनी याबाबत ची माहिती वसई पोलिसांना दिली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणराव करपे, पोलीस उपायुक्त संजय पाटील यांनी घटनास्थळाला भेट देऊन, सुटकेस ताब्यात घेऊन ती उघडली असता त्यात मुंडकी नसलेली फक्त महिलेचे धड मिळून आले आहे. महिलेची हत्या करून, तो मृतदेह सुटकेस मध्ये भरून, भरतीच्या समुद्रात फेकून आरोपी फरार झाले असावेत. ओहोटी ला ही सुटकेस किनार्यावर लागल्याने ही घटना उघड झाली आहे. याबाबत वसई पोलीस ठाण्यात अनोळखी आरोपीच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्या तपासासाठी  स्वतंत्र  4 पथक ही तयार करण्यात आले आहेत.मात्र महिलेची ओळख पटवून, आरोपीना पकडणे पोलिसा समोर एक मोठे अहवान असणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com