esakal | वसई भूषण इंदुमती बर्वे काळाच्या पडद्याआड
sakal

बोलून बातमी शोधा

Indumati Barve

वसई भूषण इंदुमती बर्वे काळाच्या पडद्याआड

sakal_logo
By
संदीप पंडित

विरार : श्रमिक महिला विकास संघ आणि मैत्रेयी महिला सहकारी पतपेढीच्या संस्थापक श्रीमती इंदुमती बर्वे (Indumati barve Death) यांचे आज वयाच्या 99 व्या वर्षी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले. त्यांच्या निधनाने अनेक महिलांच्या हाताला काम देणारी एक सखी निघून गेली आहे. बर्वे यांच्या कार्याची दखल घेत वसई ब्राम्हण सभेने (Vasai) त्यांना वसई भूषण पुरस्काराने (Vasai bhushan award) गौरविले होते.

हेही वाचा: एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ.उज्ज्वला चक्रदेव यांची नियुक्ती

वसईच्या लाखो विद्यार्थ्यांना घडविण्यात स्वतः शिक्षिका म्हणून ही त्यांचे मोठे योगदान आहे. त्याच बरोबर 1942 आंदोलनात भाग घेतला म्हणून ज्या विद्यार्थ्यांना आर पी वाघ शाळेतून काढून टाकण्यात आले. त्या विद्यार्थ्यांसाठी स.गो. वर्ट्टी सर, म्हापणकर सर यांना शाळा स्थापनेसाठी जागाही या बर्वे कुटुंबीयांनी दिली .जिथे बर्वे एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून आजची न्यू इंग्लिश स्कूल ही शाळा कार्यरत आहे. वसईच्या लाखो विद्यार्थ्यांना घडविण्यात न्यु इंग्लिश स्कूल या शाळेचा आणि त्या शाळेतील शिक्षिका म्हणून बर्वे मॅडम चे स्वतःचे मोठे योगदान आहे.त्याकाळात लांबून येणाऱ्या विद्यार्थ्यांना कधी कधी जेवण हि बर्वे बाई आपल्या हाताने बनवून देत असत तर काही विद्यार्त्याना राहण्याची सोया हि त्या आपल्या घरात करत असत.

श्रमिक महिला आणि मैत्रेयी महिला सहकारी पतपेढीच्या त्या संस्थापिका होत्या. दोन्ही संस्थांच्या उभारणीमध्ये आणि नंतरच्या प्रदीर्घ वाटचालीमध्ये इंदुमती बर्वे यांची अत्यंत महत्त्वाची भूमिका होती. श्रमिक आणि मैत्रेयीच्या सभासद भगिनी आणि संचालक मंडळाने त्यांची आई गमावली आहे. श्रमिक महिलांच्या माध्यमातून त्यांनी अनेक महिलांच्या हाताला काम देऊन त्यांचे संसार उभे केले होते. यामध्ये विधवा, परितक्त्या,घटस्फोटित महिलांचा समावेश आहे.

ज्यांची मुले मतिमंद आहेत अश्या महिलांही त्यांनी उभे राहण्यासाठी हात दिला होता. त्याच बरोबर त्यांनी महिलांच्या लहान मुलासाठी घरकुल हे पाळणाघरही सुरु केले होते. समाजातील तळागाळातील आणि ज्यांच्याकडे विशेष कौशल्य नाही त्याच बरोबर ज्यांना बोलता येत नाही अश्या महोईलच्या त्या आधारवड होत्या. गेली 31 वर्षे त्या वसई तालुका कला क्रीडा मोहोत्सवाच्या खेळाडू, कलाकार स्वयंसेवक यांना नाश्ता ,जेवण उपलब्ध करून देत होत्या . अश्या महिलेच्या निधनाने शिक्षण, सामाजिक क्षेत्रातील एक सुसंस्कृत व्यक्तिमत्व हरवल्याची भावना वसई मध्ये व्यक्त करण्यात येत आहे.

loading image
go to top