वसई तालुका कला-क्रीडा महोत्सव 26 डिसेंंबरपासून सुरू

वसई तालुका कला-क्रीडा महोत्सव 26 डिसेंंबरपासून सुरू

विरार: तिसावा वसई तालुका कला क्रीडा महोत्सव गुरुवारपासून (ता. २६) सुरू होत आहे. भारताचे माजी क्रिकेट कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन या महोत्सवाचे उद्‌घाटन करतील. मागील वर्षी क्रिकेट विक्रमवीर सचिन तेंडुलकर पाहुणे म्हणून लाभले होते.  

गुरुवारी दुपारी ४.३० वाजता वसईतील चिमाजी आप्पा मैदानावरील मा. दत्ताराम रंगमंचावर उद्‌घाटन सोहळा होईल. आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमाला आमदार क्षितीज ठाकूर व राजेश पाटील, माजी खासदार बळीराम जाधव, महापौर प्रवीण शेट्टी, माजी महापौर राजीव पाटील, प्रवीणा ठाकूर, नारायण मानकर व रूपेश जाधव यांच्यासह महापालिका आयुक्त व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहतील. त्याआधी दुपारी २ वाजता विरार टोटाळे तलावकाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याजवळ आमदार क्षितीज ठाकूर क्रीडाज्योत प्रज्वलित करतील.

मिरवणुकीने क्रीडाज्योत महोत्सवाच्या ठिकाणी आणली जाईल, अशी माहिती आयोजन मंडळाचे सरचिटणीस प्रकाश वनमाळी यांनी सोमवारी कला क्रीडा भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. या वेळी महोत्सवाचे क्रीडा विभागप्रमुख प्रा. माणिकराव दोतोंडे, मनोहर पाटील, विजय चौधरी, कला विभागप्रमुख अनिल वाझ, राजेश जोशी, प्रशांत घुमरे, प्रसिद्धिप्रमुख रमाकांत वाघचौडे, महापालिकेच्या सभापती माया चौधरी, प्रीतेश पाटील आदी मान्यवर व्यासपीठावर होते. यंदा ५५ हजारांहून अधिक स्पर्धक कला-क्रीडा महोत्सवात सहभागी होतील, असे त्यांनी सांगितले. 

कला स्पर्धेसाठी नव्या रंगमंचाला नटसम्राट दिवंगत श्रीराम लागू यांचे नाव देण्यात येणार आहे. सरत्या वर्षात राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष यश अथवा पुरस्कार मिळवलेल्या गुणवंतांचा महोत्सवात गौरव करण्यात येणार आहे. महोत्सवाचा समारोप समारंभ ३१ डिसेंबरला सायंकाळी ?? वाजता मा. दत्ताराम रंगमंचावर सुरू होईल. यावेळी आमदार हितेंद्र ठाकूर, मंडळाचे पदाधिकारी भाऊसाहेब मोहोळ, हेमंत म्हात्रे, प्रा. द. वि. मणेरीकर, रेमंड डिसिल्वा, सुरेश वायंगणकर, जितेंद्र शहा आदी 
मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

दृष्टिक्षेपात
     एकूण ६८ स्पर्धा : कला प्रकारातील ३४ आणि क्रीडा प्रकारातील ३४.
     नव्या स्पर्धा : बास्केटबॉल, रिंग फुटबॉल, काव्यवाचन, ज्येष्ठांचे कलागुण दर्शन

     विक्रमी सहभाग : कबड्डी - २३५, खोखो - ८९, 
लंगडी - ५४, लगोरी - २६ संघ 
     बास्केटबॉल स्पर्धा : मधुवन कॉम्प्लेक्‍स मैदान (गोखिवरे)
     जलतरण स्पर्धा : तामतलाव येथील तरणतलाव. 
     रिंग फुटबॉल स्पर्धा : महोत्सवाचे मैदान.
     कला विभागाच्या स्पर्धा : न्यू इंग्लिश स्कूल.

कधी, काय?
     २८ डिसेंबर : मिस्टर अँड मिस पर्सनॅलिटी सौंदर्यस्पर्धा
     २९ डिसेंबर : ‘वसई श्री’ शरीरसौष्ठव स्पर्धा
     ३० डिसरंबर : अरुण पेदे वेसावकर यांचा कोळीगीतांचा कार्यक्रम
    ?? डिसेंबर : ‘शाम शानदार’ ही चित्रपटसंगीत व नृत्याची मैफल
     २६ डिसेंबर : धनंजय म्हसणेकर यांचा लोकगीत नजराणा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com