वसई-विरार पालिका अनुसूचित जमातीसाठी राखीव 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

राज्यातील महापौरपदाचे आरक्षण आज जाहीर करण्यात आले असून यात वसई-विरार पालिकेसाठी महापौर हा अनुसूचित जमातीसाठी; तर मिरा-भाईंदरसाठी महापौरपद हे अनुसूचित जातीसाठी राखीव आहे.

विरार : राज्यातील महापौरपदाचे आरक्षण आज जाहीर करण्यात आले असून यात वसई-विरार पालिकेसाठी महापौर हा अनुसूचित जमातीसाठी; तर मिरा-भाईंदरसाठी महापौरपद हे अनुसूचित जातीसाठी राखीव आहे.

वसई-विरार पालिकेत १० वर्षांनंतर प्रथमच महापौरपद हे राखीव झाले असले, तरी पालिकेत यापूर्वीच सोशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून खुले महापौरपद हे अनुसूचित जातीतील रुपेश जाधव यांना देण्यात आले होते. वसई-विरार पालिकेत येत्या सहा महिन्यात निवडणूक होणार असून या वेळी प्रथमच महापौरपद हे अनुसूचित जमातीसाठी राखीव असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

तर मिरा-भाईंदर महापालिकेचे पुढील महापौरपद हे अनुसूचित जातीसाठी राखीव झाले आहे. मिरा-भाईंदरमध्ये भाजपची सत्ता असल्याने नगरसेवक दौलत गजरे, नगरसेविका ज्योत्स्ना हसनाळे व रुपाली मोदी या अनुसूचित जातीच्या नगरसेवकांमध्ये चुरस आहे. गजरे जुने आणि ज्येष्ठ भाजप कार्यकर्ते; तर हसनाळेदेखील अनुभवी आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vasai-Virar Municipality reserved for Scheduled Tribe