वसई विरार, नालासोपाऱ्यात, सकाळपासूनच पोलिसांची नाकाबंदी

वसई विरार, नालासोपाऱ्यात, सकाळपासूनच पोलिसांची नाकाबंदी

मुंबईः 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर वसई विरार नालासोपाऱ्यात आज सकाळी 6 पासूनच पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे. शहरातील मुख्य रस्त्यावर नाकाबंदी करून शहरात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक वाहनांची कसून तपासणी करत त्यांच्यावर कारवाई करताहेत.

सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्ष स्वागत करण्यासाठी मीरा भाईंदर वसई विरार पोलिस आयुक्त सदानंद दाते यांनी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार वसई झोन 02 चे पोलिस उपायुक्त संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली, वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांच्या पुढाकारातून  माणिकपूर पोलिस ठाणे हद्दीत डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात सकाळी 6 वाजता नाकाबंदी करण्यात आली होती.

वसई विरार नालासोपाऱ्याला मोठा समुद्र किनारा लाभला असून, पर्यटकांचे मोठे आकर्षण आहे.  समुद्र किनारे, हॉटेल्स, रिसॉर्टवर मुंबई, ठाण्यासह आजूबाजूच्या परिसरातून शेकडो नागरिक येत असतात. सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे स्वागत करताना कायदा सुव्यवस्था निर्माण होऊ नये यासाठी पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे. 

आज सकाळी पासूनच पर्यटकांची रहदारी सुरू झाली. त्यामुळे येणारे पर्यटक, वाहनधारक यांची कसून चौकशी करण्यात आली आहे. नागरिकांनी नव्या वर्षाच्या स्वागत करताना आणि सरत्या वर्षाला निरोप देताना कोविडचे संकट लक्षात घ्यावे, सरकारचे नियम पाळावेत आणि आनंदाने आपल्या कुटुंबासोबत आनंद साजरा करावा असे आवाहनही पोलिस उपायुक्त संजय पाटील यांनी केले आहे. 

-------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Vasai Virar Nalasopara Police checking 31st december celebration

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com