घरांच्या किमती सामान्यांच्या आवाक्यात!

वसई-विरारमध्ये बांधकाम साहित्‍याचे दर कमी झाल्‍याने फायदा
vasai virar now common man can afford Housing prices Benefit from lower prices of construction materials mumbai
vasai virar now common man can afford Housing prices Benefit from lower prices of construction materials mumbaisakal

वसई : कोरोनाकाळात बांधकाम व्यवसायावर परिणाम झाला होता. नागरिकांनी घरखरेदीकडे पाठ फिरवल्‍याने बांधकाम क्षेत्राला मरगळ आली होती; मात्र आता इंधनदरात काही प्रमाणात मिळालेला दिलासा आणि बांधकाम साहित्‍याचे कमी झालेले दर यामुळे वसई-विरारमध्ये नागरिकांना त्‍यांच्या स्वप्नातील घर ‘बजेट’मध्ये साकारण्याची संधी निर्माण झाली असल्‍याचे दिसून येत आहे. यामुळे बांधकाम व्यवसायालाही चालना मिळणार आहे .वसई-विरार शहरात सदनिकेचे दर ६ ते ७ हजार प्रति चौरस फूट आहे. त्यामुळे ५०० चौरस फुटच्या सदनिका खरेदीसाठी सध्या ३५ लाख रुपये मोजावे लागतात.

मात्र, बांधकाम साहित्याचे दर कमी झाल्याने आता प्रति चौरस फुटावर २५० ते ३०० रुपये दर कमी होण्याची शक्यता आहे त्यामुळे. पूर्वीपेक्षा घर घेताना किंवा बांधताना सव्वा लाख ते दीड लाखाची बचत होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. वसई तालुक्यात बांधकाम व्यावसायिक मोठ्या प्रमाणात आहेत. अनेक मोठ्या गृहप्रकल्प साकारणाऱ्‍‌या व्यावसायिकांसोबतच अनेक छोटे बांधकाम व्यावसायिकदेखील आहेत. तसेच यावर उपजीविका करणारे एजंट, कामगारांची संख्याही बरीच आहे; परंतु कोरोनाकाळात गुढीपाडवा, अक्ष्यय तृतीया, दसरा, दिवाळी, नववर्ष हे घरखरेदीचे मुहूर्त हुकले. बांधकाम व्यवसायावर त्‍याचा मोठा परिणाम झाला. सध्या मात्र बांधकामासाठी सिमेंट, विटा, रेती, लोखंडी सळ्याचे भाव कमी झाले आहेत.

पावसाळ्यामुळे दर कमी

पावसाळ्यात बांधकाम क्षेत्रात मंदी असते. काम केले जात नाही. स्वतंत्र घरेदेखील बांधली जात नाहीत. वापरणाऱ्या साहित्याचे नुकसान होऊ शकते. मजुरांची कमतरता असल्याने नव्या इमारती उभारल्या जात नाहीत. अशातच बांधकाम साहित्याचे दर कमी होऊनदेखील पावसाळ्यानंतरच कामे करावी लागणार आहेत.

भाड्याच्या घराला पसंती

सदनिकांचे वाढते दर व वेतन यात तफावत असल्याने घर घेणे अनेकांना शक्य होत नाही. त्यामुळे वसई-विरार शहरात एखाद्या सदनिकेत कमी दरात भाड्याचे घर घेतले जात आहे. सदनिकांचे दर खाली आले, तर ग्राहक स्वतःचे घर घेण्यास पुढे येऊ शकतात.

विकासकामांना फायदा वसई-विरार महापालिका रस्ते, गटार व बांधकाम विभागाशी निकडित अनेक विकासकामे शहरात करत असते. साहित्याच्या दरात घसरण झाली असल्याने याचा फायदा निश्चित महापालिका प्रशासनाला होणार आहे. कामे हाती घेताना निविदेत येणारे दर कमी होण्याची शक्यता आहे.

साहित्‍य दर

पूर्वी आता

सिमेंट (प्रतिगोण) ४०० ३६०

सळ्या (प्रतिटन) ८००० ७०००

विटा (प्रतिवीट) ७ ६०००

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com