वसई - विरारमध्येही गणरायाच्या आगमन आणि विसर्जनासाठी महापालिकेने ठरवली ही नियामावली; जाणून घ्या सविस्तर

प्रसाद जोशी | Thursday, 13 August 2020

गणपती विसर्जनाप्रसंगी तलावाजवळ आरती नाही  वसई विरार महापालिका , पोलीस प्रशासनाचा निर्णय बाप्पाला निरोप देताना मर्यादा

वसई : यंदाच्या गणपती उत्सवावर कोरोनाचे सावट असल्याने प्रशासनाने मर्यादा घातल्या आहेत. वसईच्य तलावात विसर्जन करतांना आरती होणार नाही असा निर्णय वसई विरार शहर महापालिका आणि पोलीस प्रशासनाने घेतला आहे. त्याचबरोबर गृहसंकुलात महापालिका वाहनांची व्यवस्था करणार असून मुर्ती एकत्रितरित्या तलावात विसर्जित केल्या जाणार आहेत. 

ठाण्यातील गणेशविसर्जनाबाबतही आल्या महत्वपुर्ण सूचना; ठाणेकरांना बुक करावा लागेल ऑनलाईन स्लॉट

कोरोनामुळे गर्दी टाळता यावी म्हणून हा प्रयत्न केला जात आहे. सार्वजनिक मंडळाचे 4 सदस्य तर घरगुती गणेशाची मूर्ती तलावाजवळ आणण्यासाठी केवळ 2 जणांना परवानगी देण्यात येणार आहे. मूर्ती विसर्जन महापालिका करणार आहे. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. महापालिका सहाय्यक आयुक्त ग्लिसन गोन्साल्विस, अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, पोलीस उपाधीक्षक डॉ. अश्विनी पाटील, पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळी, माजी उपमहापौर प्रकाश रॉड्रिग्ज पोलीस पाटील हरेश्वर पाटील यांच्यासह अन्य सामाजिक कार्यकर्ते आदींनी तलावाची पाहणी करून विसर्जनप्रसंगी कोणती काळजी घ्यावी या सूचना दिल्या आहे.

समुद्रात मुर्ती विसर्जनाबाबत आली सर्वात मोठी बातमी; जाणून घ्या BMC ने काय दिल्या आहेत सूचना

मर्यादित लोकांना तलावाजवळ विसर्जनासाठी येण्याकरिता परवानगी देण्यात आली आहे कोरोना प्रादुर्भाव पाहता जास्तीत जास्त भाविकांनी गृहसंकुलात विसर्जन करावे तलावाजवळ येणे टाळावे असे आवाहन महापालिकेच्या वतीने सहाय्यक आयुक्त ग्लिसन गोन्साल्विस यांनी केले आहे. तर कोरोनाचे संकट पाहता बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून माजी नगरसेवक हे त्या त्या प्रभागात मुर्ती एकत्रित करणार व टेम्पोमध्ये पिंप ठेवून त्यात कृत्रिम विसर्जन संकल्पना राबविणार असल्याचे माजी उपमहापौर प्रकाश रॉड्रिग्ज यांनी सांगितले. 

सावधान! मुंबई, ठाणे पालघरला हवामान खात्याने दिला मोठा इशारा; रायगड, रत्नागिरीतही अंबर अलर्ट जाहीर

यंदा गणरायाचे स्वागत व विसर्जन वाजतगाजत, मिरवणूक काढत होणार नाही तर अत्यंत साधेपणाने गणरायाला निरोप दिला जाणार आहे.

----------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )