खारघर, कामोठे परिसरात वसंतराव नाईक जयंती साजरी 

गजानन चव्हाण
सोमवार, 2 जुलै 2018

खारघर मधील शिव मंदिरात श्री संत सेवादास महाराज बहुउद्देशीय बंजारा समाज उन्नती मंडळाच्या वतीने वसंतराव नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली.

खारघर - खारघर, कामोठे आणि कळंबोली परिसरात माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली. कळंबोली येथे पार पडलेल्या जयंती सोहळ्यात नगरसेवक सतीश पाटील, राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या अध्यक्षा ज्योतीताई चव्हाण, राष्ट्रीय प्रवक्ते मधुकर जाठोत, रमेश राठोड आदी मान्यवर उपस्थित आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी सतीश पाटील यांनी वसंतराव नाईक यांचे विचार आत्मसात करण्याची नितांत गरज असल्याचे सांगितले. तर ज्योतीताई हिने वसंतराव नाईक हे केवळ बंजारा समाजाचे नायक नव्हे तर बहुजानाचे नायक होते. नोकरी आणि उद्योग व्यवसायच्या निमित्ताने मुंबई नवी मुंबई आणि पनवेल परिसरात वास्तव्य करणाऱ्या बंजारा समाज बांधवांनी एकजुटीने राहावे असा सल्ला दिला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ललित राठोड, भगवान पवार, जितेश आडे, मनोहर राठोड, शिवा जाधव, धनंजय राठोड, वसंत पवार विलास जाठोत, पंकज राठोड यांनी मेहनत घेतली.

खारघर मधील शिव मंदिरात श्री संत सेवादास महाराज बहुउद्देशीय बंजारा समाज उन्नती मंडळाच्या वतीने वसंतराव नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी निवास राठोड यांनी वसंतराव नाईक यांच्या जीवनावर भजन सादर केले. यावेळी रोहिदास जाधव, मिलींद पवार, विलास राठोड, एच पी राठोड डॉ. किरण नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.तर कामोठे येथील सुषमा पाटील विद्यालयात पार पडलेल्या जयंती उत्सवात डॉ आशिष जाधव, डॉ. वसंत राठोड, डॉ. किरन पवार, डॉ. निरंजन जाधव, डॉ. संतोष चव्हाण यांच्यासह सुनील आडे, खुशाल राठोड, सुनील राठोड, गणेश जाधव आदी शिक्षक मंडळी उपस्थित होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रमोद राठोड, नागोराव राठोड, श्याम राठोड, विजय चव्हाण, भीम चव्हाण पंडित चव्हाण, दिनकर राठोड यानी मेहनत घेतली.
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: Vasantrao Naik Jayanti celebrated in Kharghar Kamoth area