वाशीत मुख्यमंत्र्यांचा भव्य ‘रोड शो’

वाशीत मुख्यमंत्र्यांचा भव्य ‘रोड शो’
वाशीत मुख्यमंत्र्यांचा भव्य ‘रोड शो’

नवी मुंबई : ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार गणेश नाईक यांच्या प्रचारार्थ मंगळवारी (ता.१५) वाशी ते दिघ्यादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘रोड शो’ पार पडला. वाशी ते दिघा सुमारे सव्वातास सुरू असणाऱ्या या ‘रोड शो’ला नवी मुंबईकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हात उंचावून नवी मुंबईकरांकडून मतांचा जोगवा मागितला. यावेळी फडणवीस यांचे शहरातील चौकाचौकांत फटाक्‍यांच्या आताषबाजीसह पुष्पवृष्टीने स्वागत करण्यात आले.

मुख्यमंत्र्यांच्या या ‘रोड शो’मुळे नवी मुंबईतील वातावरण हे भाजपमय झाले होते. यावेळी प्रचारार्थ असणाऱ्या रथावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे ऐरोली मतदारसंघाचे उमेदवार गणेश नाईक, माजी आमदार संदीप नाईक, विजय चौगुले, भाजप जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, शिर्डी संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे, माजी महापौर सागर नाईक आदी पदाधिकारी उपस्थित होते. ‘रोड शो’दरम्यान चार चाकी वाहनांबरोबर दुचाकी वाहने घेऊन कार्यकर्ते हे रथाच्या मागे, तसेच पुढे चालत होते. 
वाशी येथील एमजीएम कॉम्प्लेक्‍स परिसरातून या ‘रोड शो’ला मंगळवारी रात्री ८ वाजून ४५ मिनिटांनी सुरुवात झाली. मुख्यमंत्री येणार असल्याने वाशी सेक्‍टर १४ येथील एम.जी. कॉम्प्लेक्‍स परिसरात महायुतीचे भाजप, शिवसेना व आरपीआय गटाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात दाखल झाले होते. वाशी सेक्‍टर १४ मध्ये असणाऱ्या चिंचोळ्या रस्त्यावरुनही ही रॅली  सुरळीत पार पडली. शेवटी ऐरोली येथे या रॅलीची सांगता झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com