esakal | वाशी स्थानकाजवळ तरुणाची हत्या | Murder
sakal

बोलून बातमी शोधा

Murder

वाशी स्थानकाजवळ तरुणाची हत्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : वाशी आणि सानपाडा रेल्वेस्थानकानजीक (Vashi railway station) एका अनोळखी तरुणाची डोक्यात दगड घालून हत्या (murder case) करण्यात आल्याचे मंगळवारी (ता. १२) उघड झाले आहे. या प्रकरणी वाशी रेल्वे पोलिसांनी (vashi railway police) अज्ञात मारेकऱ्याविरोधात हत्येचा गुन्हा (Police FIR) दाखल केला आहे. तसेच मृत तरुणाची ओळख पटवण्यासाठी तपास सुरू आहे.

हेही वाचा: झोपण्याच्या जागेवरून बेघर कामगाराची भिवंडीत हत्या

मृत तरुण हा २५ ते ३० वर्षांचा असून मंगळवारी त्याचा मृतदेह वाशी आणि सानपाडा रेल्वे स्थानकादरम्यानच्या पुलाखाली आढळून आला. या बाबतची माहिती मिळताच वाशी रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तरुणाचा मृतदेह ताब्यात घेतला. यावेळी सदर तरुणाच्या डोक्‍यात दगड घालून, तसेच त्याचा गळा आवळून हत्या करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात निदर्शनास आले. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून अज्ञात मारेकऱ्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला.

loading image
go to top