मालगाडीखाली चिरडून शाळकरी मुलगी ठार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 मार्च 2018

वासिंद - मध्य रेल्वेच्या वासिंद रेल्वे स्थानकानजीक रूळ ओलांडताना बुधवारी सायंकाळी कृतिका मोगरे (वय 12) या शाळकरी मुलीचा मालगाडीखाली येऊन मृत्यू झाला. खडवलीत राहणारी ही मुलगी वासिंद येथे जी. के. गुरुकुल शाळेत पाचवीत शिकत होती. शाळा सुटल्यावर वडिलांसोबत ती वासिंद रेल्वे स्थानकावर जात होती. अप लूप लाइनवर मालगाडी सायडिंगला उभी होती, त्या खालून जात असता अचानक गाडी सुरू झाली. यात चाकाखाली सापडून तिचा जागीच मृत्यू झाला. कल्याण लोहमार्ग पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद केली असून, तिचा मृतदेह वासिंद प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
Web Title: vasind mumbai news girl death railway