आवक घटल्याने भाजीपाला महागला 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 मे 2018

तुर्भे - उन्हाळ्यामुळे स्थानिक आणि परराज्यांतून होणारी भाजीपाल्याची आवक घटली आहे. कोबी, मटार, पावटा, भेंडी, गाजर, काकडी, मिरची या भाजीपाल्याचे दर वाढले आहेत. 

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजी मार्केटमध्ये राज्य तसेच परराज्यांतून भाजीपाल्याची 496 गाड्या आवक झाली. हिमाचल प्रदेशातून मटार, तमिळनाडूतून शेवगा, मध्य प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकातून हिरवी मिरची, कर्नाटकातून तोतापुरी कैरी, गुजरात व कर्नाटकातून कोबी अशी आवक परराज्यांतून झाली, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली. 

स्थानिक भागातून सातारी आले 838 क्विंटल, टोमॅटो 1886 क्विंटल, फ्लॉवर 917 क्विंटल, कोबी 1671 क्विंटल, शेवगा 502 क्विंटल, पारनेर भागातून मटार 851 क्विंटल, गावरान कैरी 1102 क्विंटल, आवक होत आहे. लिंबूची आवक वाढल्याने त्याचे दर कमी झाले आहेत. लिंबूचे 100 नग हे 100 ते 200 रुपये, टोमॅटो 4 ते 8 रुपये किलो घाऊक बाजारात विकले जात आहेत. टोमॅटोची आवक वाढल्याने त्याचे दरही कमी झाले आहेत. पालेभाज्या मात्र महागल्या असून मालाला उठाव नसल्याने माल उन्हामुळे खराब होत असल्याने व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे सांगितले जाते. ऊन आणि सध्या सुरू असणाऱ्या लग्नसराईमुळे भाज्यांचे दर वाढले आहेत. किरकोळ बाजारात भाज्यांचे दर हे अव्वाच्या सव्वा वाढले आहेत. बहुतांश भाज्यांचे दर हे दुपटीने वाढले असले, तरी टोमॅटोच्या दरात मात्र मोठी घसरण झाल्याचे व्यापारी रामदास पोवळे यांनी सांगितले. 

Web Title: Vegetable expensive in mumbai