ओवेतील भाजी मार्केट जमीनदोस्त 

अनधिकृत फेरीवाल्‍यांवर कारवाई.
अनधिकृत फेरीवाल्‍यांवर कारवाई.

खारघर : ओवे गाव बस थांबा आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल कार्यालयासमोर सिडकोच्या राखीव भूखंडावर फेरीवाल्यांनी थाटलेले अनधिकृत भाजी मार्केट सिडकोच्या अतिक्रमणविरोधी पथकाने जमीनदोस्त केले. शुक्रवारी (ता.८) सिडकोच्या अतिक्रमण विभागाने ही कारवाई केली. 

या वेळी सिडकोचे अधिकारी, पोलिस अधिकारी, सुरक्षा रक्षक आणि पन्नासहून अधिक कामगार उपस्थित होते. 

खारघर सेक्‍टर ३० मधील ओवा गाव बस थांब्यासमोरील सिडकोच्या राखीव मैदानावर तीस ते चाळीस फेरीवाल्यांनी अनधिकृतपणे व्यवसाय थाटला होता. या ठिकाणी सिडकोने पूर्वी कारवाई केली होती; मात्र फेरीवाल्यांनी पुन्हा बांबूच्या साह्याने भाजी बाजार थाटला. शुक्रवारी सिडकोच्या अतिक्रमणविरोधी पथकाची कारवाई नावडे परिसरात होती. काही कारणास्तव मोहीम पुढे ढकलल्याने अचानक त्याच मार्गावरील ओवेगाव येथील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल कार्यालयासमोर सिडकोच्या राखीव भूखंडावर अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई केल्याने फेरीवाल्यांची धांदल उडाली. या वेळी टाटा हॉस्पिटलसमोरील जागेवर अनधिकृतपणे सुरू असलेल्या दुकानांवर जेसीबी आणि कामगाराच्या मदतीने कारवाई करण्यात आली. 

सिडकोच्या जागेवर काही फेरीवाल्यांनी अनधिकृतपणे भाजी व्यवसाय थाटला होता. त्‍यामुळे कारवाई केली.
- विशाल ढगे, सहायक अधिकारी, सिडको.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com