श्‍वानाच्या मृत्यूप्रकरणी वाहनचालकाला अटक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 फेब्रुवारी 2017

मुंबई - वळणाचा अंदाज न आल्याने वाहनाच्या धडकेत श्‍वानाचा मृत्यू झाला. मुलुंड नवघर येथे नुकतीच ही घटना घडली. सामाजिक संस्थेने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून वाहनचालकाला अटक केली. न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केली. नवघर पोलिस ठाण्याअंर्तगत एका सोसायटीजवळील एटीएममधून पैसे काढल्यानंतर वाहनचालक औषधाच्या दुकानात निघाला होता. त्या वेळी वळणाचा अंदाज न आल्याने रस्त्यालगत झोपलेला श्‍वानाच्या अंगावर वाहन गेले. हा अपघात एका महिलेने पाहिला. तिने जखमी श्‍वानावर प्रथमोपचार केले. मात्र श्‍वानाचा मृत्यू झाला. श्‍वानाच्या मृत्यूची माहिती कळताच एका सामाजिक संस्थेने याबाबत नवघर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी वाहनचालकाला अटक केली.
Web Title: vehicle driver arrested