मंत्रालय परिसरात वाहने हटाव मोहीम!

मंत्रालय परिसरात वाहने हटाव मोहीम!

मुंबई : अनधिकृतपणे उभी करून वाहतुकीस अडथळा करणऱ्या दुचाकी, चारचाकी खासगी व सरकारी वाहनांची हटाव मोहीम मंत्रालयात प्रवेश करणाऱ्या ओव्हल मैदानाकडील आरसा गेटवर शनिवारी दुपारी जोरात सुरू होती.

मंत्रालय आणि परिसरात वाहन पार्किंगची समस्या फार मोठी आहे. आज आठवड्याचा अखेरचा दिवस शनिवार असल्याने तशी मंत्रालयात येणाऱ्या अभ्यागतांची वर्दळ कमी असते. तरीही मंत्रालयात प्रवेश करणाऱ्या तीनचार ठिकाणी दुचाकी, चारचाकी वाहनांचा बेसुमार गराडा पडला आहे. सोमवार, मंगळवार, बुधवार कार्यालयीन वेळेत तर मंत्रालय परिसर आणि मंत्रालय यात सरकारी तसेच खासगी वाहनांची रेटारेटी असते. त्यामुळे वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवले जातात. यातच राजकीय नेते, लोकप्रतिनीधी, आमदार, खासदार, वरिष्ठ सनदी अधिकारी यांची वाहने जागा मिळेल तिथे घुसून उभी आसतात. त्यामुळे वाहतूक नियंत्रण विभागाचे अधिकारी-कर्मचारी यांना आपले कर्तव्य पार पाडणे जिकरीचे होते.

त्यातच एखाद्या व्हीआयपीची गाडी उचलली, टोचन लावले तर नसती आफत नको म्हणून सहसा या परिसरातील वाहनावंर कारवाई केली जात नाही. याचा फटका मंत्रालयाला आग लागली होती तेव्हा 2012 मधे बसला होता. आग विझवणारे बंब आत पार्क केलेल्या वाहनामुळे आत येऊच शाकले नव्हते. प्रसंगी आग वाढत गेली आणि अनर्थ झाला. आज मात्र आरसा गेटवर दुचाकी उचलायची मोहिम सुरू होती. काल-परवाच दसरा सणाला वाहन पुजा करून घातलेले झेंडूचे सुकलेले हार मात्र वाहन उचलत असताना तिरकस नजरेने हा सारा प्रकार होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com